पुल्लर – पचखेडी मार्गावर वाघीणीचे पिल्ल्यासह झाले दर्शन
त्रिशा राऊत
क्राईम रिपोटर नागपुर जिल्हा प्रतिनिधि .मो 9096817953
भिवापूर.:- पुल्लर व गोठणगाव परिसरात वास्तव्यास असलेली एफ 2 वाघिणीचे दर्शन नागरीकांना होत असून याबाबत चा व्हिडिओ पुल्लर येथिल प्रफुल्ल पाल यांनी दोन दिवसा पुर्वी घेतला आहे. तिच्या सोबत लहान पाच पिल्ले असल्याचे दिसून येत आहे. याबाबत कऱ्हाडला -पवनी अभयारण्यचे वनअधिकारी बन्सोड यांना याबाबत विचारणा केली असता. एफ- 2 या वाहिनीचे वास्तव्य गोठणगाव परिसरात असून तिला सहा महिन्याचे पाच पिल्ले असल्याची माहीती त्यांनी दिली असून वाघिनलहान पिल्यांना ४५ दिवसा नंतरच बाहेर काढत सांगितले.