महाराजांसारखे दिसण्यापेक्षा महाराजांचा एक तरी गुण अंगी स्वीकारावा म्हणजे आयुष्याचे सार्थक होईल. – डॉ राजाराम हुलवान

90

महाराजांसारखे दिसण्यापेक्षा महाराजांचा एक तरी गुण अंगी स्वीकारावा म्हणजे आयुष्याचे सार्थक होईल. – डॉ राजाराम हुलवान

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:- उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था खंडाळे अलिबाग येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माणुसकी प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ राजाराम मायाप्पा हुलवान, तेजस्विनी फाउंडेशन च्या संस्थापिका ॲड. जीविता पाटील व डॉ. सागर गवळी यांच्या शुभहस्ते पुष्पहार व दीप प्रज्वलन करून शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा श्रीम. उज्ज्वला चंदनशिव /चव्हाण, डॉ. राजाराम हुलवान, ॲड. जीविता पाटील,डॉ. सागर गवळी, डॉ. आनन पाटील तसेच ऑफिस स्टाफ उपस्थित होता.

छत्रपती शिवरायांचा आठवावा प्रताप याप्रमाणे महाराजांची जीवनशैली त्यांचे पराक्रम आठवून त्यातील एक तरी गुण आपण आपल्या अंगी बाळगावा ज्यामुळे समाजामध्ये माणुसकी टिकून राहील व सगळीकडे आनंदमय वातावरण दिसेल , असे या कार्यक्रमाप्रसंगी माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ राजाराम हुलवान यांनी सांगितले.
तेजस्विनी फाउंडेशन संस्थापिका ॲड.जीविता पाटील यांनी स्त्रियांचे मनोधैर्य वाढवणे व स्त्रियांवरील अत्याचार कमी करणे ज्याप्रमाणे महाराजांनी प्रत्येक स्त्री ही मातेसमान मांनली त्याप्रमाणे महिलांचा आदर सर्वांनी केला पाहिजे असे सांगितले.
अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव यांनी पाहुण्यांचे स्वागत करून सर्वांचे आभार मानले.