११ लाख रेशनकार्ड धारकाची ई-केवायसी पूर्ण
५४ हजार लाभार्थींची ई केवायसी रद्द ;अद्याप ३८ टक्के लाभार्थी बाकी; २८ फेब्रुवारी पर्यंत मुदत वाढ
रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:-रायगड जिल्ह्यातील शिधाधारक लाभार्थींना आधार प्रमाणीकरण ई केवायसी ची नोंदणी १६ फेब्रुवारी पर्यंत ६२% झाली आहे. उर्वरित नोंदणीचे काम सुरु असून शासनाने १५ दिवसांची मुदत वाढवून दिली असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. १६ फेब्रुवारी पर्यंत १० लाख ८३ हजार ७९८ इतक्या सदस्यांची आधार प्रमाणीकरण ई केवायसी झाली आहे.
राष्ट्रीय विभाग अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग मार्फत मागील काही महिन्यात मोठे पाऊल उचलण्यात आले आहे देशातील आणि राज्यातील सर्व रेशन कार्ड शिधापत्रिका लाभार्थी धारक यांना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमधून अत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीना अन्नधान्याचे वाटप केले जाते. शिधा केवळ लाभापात्रा पर्यंत पोहचावा यासाठी केवायसी चा उद्देश आहे या प्रक्रियेमुळे अपात्र लाभार्थाना हटवून अधिक पारदर्शकता निर्माण होणार आहे. यामुळे मोफत शिधा गरजूंपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.
रायगड जिल्ह्यात १७ लाख ६२ हजार ६०९ इतके शिधा मेंबर आहेत. यापैकी ६ लाख १२ हजार ६६८ मेंबरचे अहवाल प्राप्त झाला आहे. तर ४ लाख ७१हजार १३० मेंबर चे ई केवायसी झालेले आहे. मात्र तहसील कार्यालयातून ते पात्र आहेत असा अहवाल येणे बाकी आहे. ५४ हजार ५४१ मेंबर की ई केवायसी काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. उर्वरित ६ लाख ७८ हजार ८११ मेंबरचे काम सुरु असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
यापूर्वी एक केवायसी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2024 होती ती नंतर तीस नोव्हेंबर 2024 करण्यात आली मात्र आता पुन्हा मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती 15 फेब्रुवारी पर्यंत ची मुदत दिली होती मात्र अजूनही काही लाभार्थी ही केवायसी केली नाही त्यामुळे शासनाने 28 फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली आहे मुदत वाढवूनही केवायसी केले नाही तर त्याला केवळ रेशन मिळवणे थांबणार नाही तर त्याचे नाव शिधापत्रिकेतून काढून टाकले जाऊ शकतो शिधापत्रिकेच्या लाभ घेणाऱ्या सर्वांना हा नियम लागू आहे अशा परिस्थितीत सर्व शिधापत्रिकेधारकांनी ही महत्त्वाची माहिती गांभीर्याने घ्यावी आणि ही केवायसी वेळेवर पूर्ण करावे जेणेकरून रेशन मिळवण्यात कोणती अडचण येणार नाही असे जिल्हा पुरवठा विभागाने म्हटले आहे
*६ लाख ७८ हजार लाभार्थींचे केवायसी पूर्ण करण्याचे आव्हान*
रायगड जिल्ह्यात १७ लाख ६२ हजार ६०९ इतके शीधा मेंबर आहेत. यापैकी ६लाख १२हजार ६६८ मेंबरचे अहवाल प्राप्त झाला आहे. तर ४लाख ७१हजार १३०मेंबरचे ई- केवायसी झालेले आहे. मात्र तहसील कार्यातून ते पात्र आहेत असा अहवाल येणे बाकी आहेत ५४ हजार ५४१मेंबरची केवायसी काही कारणास्तव रद्द करण्यात आली आहे. उर्वरित ६लाख ७८ हजार ८११ मेंबर चे काम सुरू असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.
आधार प्रमाणीकरण ई केवायसी ची नोंदणी सुरू आहे. प्रत्येकाने ती करणे अनिवार्य आहे. असे असले तरी कोणाचेही धान्य थांबविले नाही प्रत्येक महिन्याच्या 18 तारखेपूर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पूर्ण करावे अशा सूचना दुकानदाराने देण्यात आले आहेत.
सर्जेराव सोनवणे
जिल्हा पुरवठा अधिकारी रायगड