राजकीय क्षेत्रात एकच खळबळ माजली, नागरीकांचे ग्रामसभेकडे लक्ष.
त्रिशा राऊत क्राईम रिपोर्टर नागपूर
मो 9096817953
भिवापूर: – .गडचिरोली नागपूर महामार्गावर असलेल्या गट ग्रामपंचायत पांजरेपार (पुनर्वसन) येथील सरपंच आकांक्षा पंकज मानवटकर यांच्या विरुद्ध दि. २० फरवरी गुरुवारला दुपारी दोन वाजता आयोजीत ग्रामपंचायतच्या विशेष सभेत अविश्वास पारीत करण्यात आला. गट ग्रामपंचायत पांजरेपारच्या सरपंच मानवटकर यांच्यावर ग्रामपंचायत मासीक सभा नघेणे, १५ व्या वित्त आयोगाचा खर्च ठराव मंजूर न करता परस्पर खर्च करणे, ठराव न घेता कामे करणे, सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेणे, ग्रामपंचायत सदस्यांना अपमानास्पद बोलणे व गैरवर्तणूक वागणूक करणे इत्यादी कारणांवरून चार सदस्यांनी सरपंचा विरुद्ध अविश्वास घेण्यासंदर्भात तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार गट ग्रामपंचायत पांजरेपार ची तहसिलदार कल्याणकुमार डहाट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेवून त्यात मतदान घेण्यात आले एक विरुद्ध चार मताने अविश्वास ठराव पारित करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रातचांगलीच खळबळ माजली आहे. याबाबत पांजरेपार ग्राम पंचायत उपसरपंच किसन बोरकर यांनी दिलेली प्रतिक्रिया दिली आहे