बागेतील छोटे झाड तोडले म्हणून 12 वर्षीय चिमुकलीला जिवंत जाळले.

53

बागेतील छोटे झाड तोडले म्हणून 12 वर्षीय चिमुकलीला जिवंत जाळले.

 12-year-old Chimukali was burnt alive as a small tree in the garden was cut down.

बेगुसराई,दि.20 मार्च:- बिहार राज्यातील बेगुसराई जिल्हातुन भयंकर आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. खेळता खेळता बागेतील छोटे झाड तोडले म्हणून एका 12 वर्षीय मुलीला एका नराधमाने इसमाने जिवंत जाळल्याची घटना बिहारमधील बेगुसराई येथे घडली आहे. सिकंदर यादव असे त्या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

नराधम सिकंदर याने पत्नी व मुलीच्या मदतीने त्या 12 वर्षाचा मुलीला केरोसिन ओतून पेटवून दिले होते. सुदैवाने आजुबाजुच्या नागरिकांनी ती आग विझवली व तिला रुग्णालयात दाखल केले. मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

बेगुसराई मधील सिवारना गावात सदर मुलगी तिच्या पालकांसोबत राहत होती. शुक्रवारी ती खेळत असताना सिकंदरच्या घराजवळील बागेत गेली. तिथे चुकून तिचा पाय एका रोपट्यावर पडला. कुणीतरी आपल्याला ओरडेल या भीतीने तिने ते रोपटे मूळासकट काढले. तितक्यातच सिकंदरने ते पाहिले. त्याने त्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

इतक्यावरच तो थांबला नाही. त्यानंतर त्याची पत्नी व मुलीने त्या मुलीच्या अंगावर केरोसिन ओतले व सिकंदरने तिला पेटवून दिले. ती मुलगी जिवाच्या आकांताने ओरडू लागली तरी सिंकदरच्या कुटुंबीयांनी तिच्यावर दया आली नाही. त्यानंतर शेजारच्यांनी त्या मुलीला लागलेली आग विझवली व तिला रुग्णालयात दाखल केले. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.