पुणे जिल्हातील ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांच्यावर खंडणीसह ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल.
✒️पुणे जिल्हा प्रतिनिधी✒️
पुणे,दि.20 मार्च:- जिल्हातील अकलूज पोलिस स्टेशन क्षेत्रात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेक वर्षापासुन लग्नाच आमीष देऊन दलित समाजाच्या मुलीवर अत्याचार सुरु होता. या बलात्कारातील आरोपी अक्षय धनाजी शिंदे याच्या वडिलाकडून 1 लाख 30 हजार रूपये ब्लॉकमेल करुन मागून अक्षय शिंदे व पीडित दलित मुलीला मारहाण केल्याने ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांच्यावर अकलूज पोलिस स्टेशनमध्ये खंडणीसह ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल झाला आहे.
प्राप्त माहितीनुसार अक्षय धनाजी शिंदे रा. लवंग याचे व एका पीडित दलित मुलीचे गेल्या वर्षभरापासून प्रेमप्रकरण सुरू होते. यादरम्यान आरोपी अक्षयने वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून सदरच्या मुलीशी शारिरीक संबंध ठेवले होते. मात्र अक्षयच्या वडिलाने त्या मुलीचा नाद सोडण्यासाठी आरोपी अक्षयवर प्रचंड दबाव आणल्याने वडिलांच्या दबावामुळे अक्षयने पीडित मुलीचा नाद सोडला. याची कुणकुण अकलूज ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांना लागताच त्यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी अक्षय शिंदे व पीडित दलित मुलीला एकत्र बोलावून दोघांनाही मारहाण केली. त्याचबरोबर अक्षय शिंदे याच्या वडिलाकडून ज्योती कुंभार यांनी एक लाख तीस हजार रूपये घेतले. त्यामुळे पीडित दलित मुलीने अक्षय शिंदे याच्यावर 376 सह ऍट्रोसिटी व ग्रामपंचायत सदस्या ज्योती कुंभार यांच्यावर खंडणीसह ऍट्रोसिटी ऍक्टअन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू हे करीत आहेत.