विदर्भात अवकाळी पाऊसाबरोबर गारपीट, शेतीचं मोठ नुकसान.
✒आशीष अंबादे प्रतिनिधि ✒
नागपुर/वर्धा,दि.20 मार्च:- 3 दिवसा पासुन विदर्भातील नागपुर, वर्धा, यवतमाळ चंद्रपुर, अमरावती, बुलडाणा, भंडारा जिल्हात विजेच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला त्यांमुळे मोठ्या प्रमाणात नुसकान झाल्याचे सर्मोर येत आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यामध्ये वादळी वा-यासह पाऊस आणि गारपीट झाली. वर्धा जिल्ह्यात विजेच्या कडकटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वर्धा जिल्ह्यातील जवळपास 8 तालुक्यांना पावसाचा मोठा फटका बसलाय. हिंगणघाट तालुक्यात गुरुवारी आणि शुक्रवारी जोरदार पाऊस पडला. वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळं गहू, चना या पिकांचं नुकसान झाल्याची माहिती आहे.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर, सिन्दी रेल्वे, आर्वी, पुलगाव, देवळी या तालुक्यांमध्येही गारपीट झाली.
यामुळे काढणीला आलेला गहू, कांदा या पिकांचं नुकसान झालं आहे.