नागपूरात लव सेक्स और धोका, बलात्कार करुन प्रेमिकेचा केला गर्भपात

62

नागपूरात लव सेक्स और धोका, बलात्कार करुन प्रेमिकेचा केला गर्भपात.

 Love sex and danger in Nagpur, rape and abortion

✒युवराज मेश्राम प्रतिनिधी✒
नागपूर,दि.20 मार्च:- नागपुरातुन लव सेक्स और धोका देनारी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. आपल्या दुस-या प्रेमीकेसाठी पहिल्या प्रेमिकेला धोका दिला. आणि दुसरी बरोबर रहण्यासाठी आपल्या पहिला प्रेमीकेचा जबरदस्तीने गर्भपात केल्याने. आराेपीविराेधात सदर पाेलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जुनी कामठी निवासी नाैशाद मंसुरी नवशाही वय 26 वर्ष असे आराेपीचे नाव आहे. गाेधनी निवासी 24 वर्षीय प्रेमिकेने ही तक्रार दिली आहे.

काही दिवसांपूर्वी पहिल्या प्रेमीकेने आरोपी नाैशाद मंसुरी नवशाही यांचा पाठलाग केला असता सदर आराेपी हा दुसऱ्या युवतीसह ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत असल्याचे लक्षात आले.

प्राप्त माहितीनुसार, गाेधनी निवासी फिर्यादी युवतीशी आराेपीची 2019 पासून ओळख हाेती. यानंतर दाेघांमध्ये मित्रता वाढली. वर्षभरानंतर सदर निवासी एका मित्राकडे नेत लग्नाचे आमिष दाखवून आराेपीने तिच्याशी संबंध स्थापित केले. हे सत्र पुढे अनेक दिवस चालले. यादरम्यान गर्भवती राहिल्याने युवतीने नाैशादला लग्नाबाबत बाेलत हाेती. मात्र आराेपीने गर्भपात केल्यानंतर लग्न करताे असे सांगितले. यादरम्यान मुलीच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती झाली.

ताे मात्र टाळाटाळ करीत हाेता. त्याच्याबाबत माहिती घेतली असता नाैशादचे दुसऱ्या एका युवतीशी संबंध असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी युवतीने दुसऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्या घराजवळून माहिती घेतली असता ते दाेघे एकत्र राहत असल्याची बाब लक्षात आली. त्यामुळे तरुणीने सदर पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. युवतीच्या तक्रारीवरून सदर पाेलिसांनी आराेपीविराेधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.