लावणी कलावंत महासंघाचा सहावा वर्धापन दिन सोहळा संपन्न
‘कोविड देवदूत आणि कोविड दानशूर व्यक्तीचा सन्मान.
मुंबई (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रसह मुंबईतील कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणजेच लावणी कलावंत महासंघ,या महासंघाचा सहावा वर्धापन दिन कलाकारांसह काही कोविड देवदूत आणि दानशूर व्यक्तीच्या उपस्थित दामोदर हॉल,परळ येथे संपन्न झाला.
या सोहळ्याला स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव,आम.यामिनी जाधव,नगरसेविका सोनम जामसुतकर,सिनेअभिनेते मालवणी सम्राट दिगंबर नाईक,मिमिक्री स्टार डी. महेश यांच्यासह अनेक मान्यवर आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
कोविड-१९ मुळे सदर कार्यक्रम आठ ते नऊ महिने पुढे गेला त्यामुळे कलाकारांचा या लॉक डाऊन मुळे सर्वच व्यवसाय आणि कलेच्या जीवावर आपले कुटूंब चालवणाऱ्या या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली.परंतु समाजातील काही दानशूर व्यक्तींनी या कलावंतांना सढळ हस्ते अन्नधान्य किट वेळोवेळी दिल्यामुळे कलाकारांना काही प्रमाणात आधार मिळाला. ज्यांची परिस्थिती चांगल्यापैकी होती त्या कलाकारांनी जवळपासच्या कलाकारांसह इतर समाजातील व्यक्तींना मदतीचा हात दिला त्या कलाकारांचा आणि दानशूर व्यक्तीचा सन्मान करण्याचा मानस यावेळी लावणी कलावंत महासंघाने घेतला होता.त्यानुसार अनेक कलाकार,आणि दानशूर व्यक्तीचा सन्मान या प्रमुख पाहुणेच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी लावणी कलावंत महासंघाचे अध्यक्ष,संतोष लिंबोरे-पाटील,सरचिटणीस जयेश चाळके,यांच्यासह सर्व टीमने प्रचंड मेहनत घेऊन हा सोहळा यशस्वीपणे पार पाडला.