16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकाने केला अत्याचार, नात्याला फासला काळिमा.

62

16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर काकाने केला अत्याचार, नात्याला फासला काळिमा.

Uncle abuses 16-year-old girl, tarnishes relationship

✒पुणे जिल्हा प्रतिनिधी✒
खेड,दि.20 मार्च:- खेड तालुक्यातील राजगुरूनगर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परीसरात संतापाची लाट पसरली आहे. राजगुरुनगर येथे नात्याने काका असलेल्या नराधमाने नात्यातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. माणुसकीला आणि नात्याला काळिमा फासणारी घटना असून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेलम माहिती अशी की, आरोपी पीडितेचा जवळचा नातेवाईक असल्यामुळे वरचेवर राजगुरूनगर येथे घरी मुक्‍कामी राहण्यास येत असे. रविवारी (दि. 14) आरोपी पीडित मुलीच्या घरी मुक्‍कामी होता. रात्रीचे जेवण करून सगळे झोपले.

मध्यरात्री आरोपी पीडितेच्या खोलीत गेला अन्‌ ती झोपेत असताना तिच्यासोबत लैंगिक कृत्य केले. दरम्यान, पीडिता जागी झाली आणि ओरडण्याचा प्रयत्न केला तेव्हा नराधम आरोपीने तिचे तोंड दाबून तू आरडोओरड केली तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली. यामुळे ती घाबरुन गेली. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर गेला तेव्हा पीडिताने आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे हा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला.