दलित समाजाला माणूसपण मिळवून देणाऱ्या चवदार तळे सत्याग्रहाला ९५ वर्षे पूर्ण, लाखो नागरिकांनी केले अभिवादन

80

पुराच्या पाण्यामुळे प्रदूषित झालेल्या तलावाच्या पाण्याला योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शुद्ध आणि पिण्यायोग्य करण्याची होतेय मागणी

चवदार तळे सत्याग्रहाला ९५ वर्षे पूर्ण, लाखो नागरिकांनी केले अभिवादन

सिद्धांत
२० मार्च, महाड: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजाला पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी २० मार्च १९२७ ला महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला. या ऐतिहासिक घटनेच्या ९५ व्या वर्षपूर्तीच्या दिवशी महाडमध्ये देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी चवदार तळ्यावरील पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जमले होते. कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर दोन वर्षानंतर ह्यावर्षी चवदार तळ्याला भेट देणाऱ्या अनुयायायांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

जितेंद्र आव्हाड आणि अदितीताई तटकरे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालून केले अभिवादन
महाड सत्याग्रहाच्या निमित्ताने मानणीय अदिती तटकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला. तसेच यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय सैन्यातील महार रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांबद्दल चर्चा केली. भारतीय लष्करी इतिहासात अनेकवेळा शौर्य गाजवणाऱ्या महार रेजिमेंटच्या सैनिकांना आता जयभीम बोलण्यावर बंदी घातली असल्याची तक्रार यावेळी सैनिकांनी मांडली. सैनिकांवर अशी बंदी का घालण्यात आली याबद्दल मी भारताच्या संरक्षण आणि लष्कर मंत्र्यांना विचारणार असल्याचे आश्वासन जितेंद्र आव्हाड यांनी दिले.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी महाडमध्ये दाखल
कोरोनाच्या गेली दोन वर्षात चवदार तळ्याच्या स्मृतिदिन अनेक बंधनांखाली साजरा कारवायास लागला होता. परंतु ह्यावर्षी कोरोना आटोक्यात आल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनुयायांनी मोठ्या संख्येने चवदार तळ्यावर आपली उपस्थित झाले होते. संध्याकाळी उशिरापर्यंत लांब पल्ल्यावरून अनुयायांच्या बस,गाड्या महाडमध्ये पोहचत होत्या.

चवदार तळे शुद्धीकरण
महाडमध्ये आलेल्या पुराचे पाणी चवदार तळ्यामध्ये मिश्रित झाल्याने तळ्याचे पाणी पिण्यास योग्य राहिलेले नाही. याबाबतची सूचना शासनातर्फे जमलेल्या अनुयायांना दिली जात होती. याबाबत अनुयायांनी आपले मत मांडताना म्हटले कि, शासनाने योग्य त्या तंत्रज्ञानाचा वापर करून लवकरच ऐतिहासिक चवदार तलावाचे पाणी पुन्हा एकदा शुद्ध आणि चवदार करावे.