उप वन परीक्षेत्र धाबा अंतर्गत चेक पारगाव येथे जागतिक वन दिन साजरा
21 मार्च जागतिक वन दिन निमित्ताने जि प उच्च प्राथमिक शाळा चेक पारगाव येथील विद्यार्थ्यांची कलापथक ची मेजवानी
राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177
गोंडपिपरी :-आज धाबा उप वन परीक्षेत्रातील डोंगरगाव मधील चेक पारगाव येथे 21 मार्च जागतिक वन दिना निमित्य जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चेक पारगाव येथील विद्यार्थी गावात प्रभात फेरी काढून कला पथकाचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. व गावकऱ्यांमध्ये वनाविषयी व वन्य प्राण्यांच्या विषयावर जन जनजागृती करण्यात आली. शाळेत निबंध स्पर्धा, चित्रकला, व सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आले. सदर कार्यक्रमास चेक पारगाव येथील शिक्षक वर्ग व श्री गेडाम साहेब क्षे. स. धाबा श्री ठाकरे साहेब वनरक्षक डोंगरगाव कु पेंदाम मॅडम वनरक्षक वेळगाव व श्री चुधरी साहेब वनरक्षक हजर होते तसेच चेक पारगाव येथील सरपंच उपसरपंच पोलिस पाटील व गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती