मित्रांनीच केली मित्राची निघृन हत्या व वैनगंगेत फेकला मृतदेह 

मित्रांनीच केली मित्राची निघृन हत्या व वैनगंगेत फेकला मृतदेह 

मित्रांनीच केली मित्राची निघृन हत्या व वैनगंगेत फेकला मृतदेह 

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मिडीया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞

भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील मौजा बेला येथे चार मित्रांनी भांडणाचा बदला घेण्यासाठी एका तरुणाला घरातून उचलुन वैनगंगेच्या जुन्या पुलावर नेवून निथे तलवारीने वार करून त्याची निघृन हत्या करून मृतदेह वैनगंगा नदीत फेकले. सात दिवसांनतर त्याचे मृतदेह आढळून आला. ही धक्कादायक घटना मौजा बेला (भंडारा ) येथे दिनांक १७ मार्च २०२२ गुरुवार रोजी संध्याकाळी वैनगंगा नदीपात्रात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
महेन्द्र उर्फ टिंकु संतोष दहिवले वय ३६ वर्षे रा. सुभाष वार्ड बेला असे मृतकाचे नाव आहे. तर शुभम उर्फ आर्यन नंदकिशोर मंदुरकर वय २१ वर्षे रा. कृष्ण मंदीर वार्ड भंडारा, निशान उर्फ अम्मु अनिल कटकवार वय २० वर्षे रा. आंबेडकर वार्ड भंडारा, हेमंत उर्फ भांजा रा. टप्पा वार्ड भंडारा अशी आरोपींची नावे आहेत.
९ मार्च रोजी महेन्द्र आणि आरोपी शुभम मंदुरकर यांच्यात भांडण झाले होते. या भांडनाचा वचपा काढण्यासाठी १० मार्च रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी शुभम, निशान, आणि दिपांशु हे दुचाकी क्रमांक एम. एच. ३६ / ए. जे. ३९९९ ने महेन्द्रच्या बेला येथील घरी गेले. त्याला घरून उचलुन त्यांनी महेन्द्रला रात्री वैनगंगेच्या जुन्या पुलावर आनले, त्या ठिकानी त्याला म्हणजे महेन्द्रला जबर मारहान करण्यात आली. त्याच्या शरिरावर तलकरीने वार करून त्याचा खुन करण्यात आला. त्यानंतर त्याचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकून देण्यात आला. व महेन्द्रला बासाच्या काठीने पाण्यात बुडविण्यात आले. व संपूर्ण आरोपी नेथून पसार झाले.
इकडे महेन्द्र बेपत्ता असल्याने त्याच्या कुटूंबीयांनी १४ मार्च रोजी भंडारा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली होती. दरम्यान १७ मार्च रोजी त्याचा मृतदेह वैनगंगा नदीपात्रात आढळून आला. भंडारा पोलीसांनी तक्काल घटनास्थळी पोहचून तपास कार्याचा वेग वाढवीला. तपासाअंती आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी भंडारा पोलीसांनी आरोपींन विरुद्ध भादविच्या कलम ३६४, ३०२, २०१, १२० ( ब ) ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास भंडारा पोलीस यांचे सुरुच आहे.