प्रशासन लागले कामाला, लोकसभा निवडणुकीचे अधिसूचना होणार जारी
आजपासून स्वीकारले जाणार उमेदवारी अर्ज
✍️भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱 मो.नं.9373472847📞
भंडारा : भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार २०मार्च २०२४ मार्च पासून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद कक्षामध्ये नामनिर्देशन पत्र प्रक्रिया होईल.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी काढलेल्या आदेशानुसार नामनिर्देशन प्रक्रियेच्या प्रमुख अप्पर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी आशा पठाण यांच्या नेतृत्वात अधिनस्त अधिकारी, कर्मचारी नामनिर्देशन पत्रांची स्वीकृती छाननी प्रक्रिया पार पडणार आहे.दरम्यान प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू झाली असली तरी प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत त्यामुळे रणधुमाळीला वेग आलेली नाही.
*नामांकन भरण्यासाठी दुपारी ३०० वाजेपर्यंत वेळ*
निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २० ते २७ मार्च २०२४ चे सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या दरम्यान नामनिर्देशन पत्र उमेदवारांना दाखल करता येतील. यादरम्यान सुट्टीचे दिवस वगळून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया सुरू राहील.
*अशा आहे निवडणूक आयोगाचे कार्यक्रम*
निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार २८ मार्च २०२४ तारखेला छाननी प्रक्रिया राहील त्यानंतर ३० मार्च ही तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. अधिसूचना जारी करणे २० मार्च २०२४ उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २७ मार्च, अर्जाची छाननी २८ मार्च, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ३० मार्च, मतदान १९ एप्रिल, आणि मतमोजनी ४ जुन ,निवडणूक प्रक्रिया ६ जूनला पूर्ण होईल.
*अंतिम मतदार यादी आली, आजच तपासा आपले नाव*
भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी अंतिम मतदार यादी प्रकाशित झाली आहे. त्यामुळे मतदारांनी आजच आपल्या नाव यादव तपासून घ्यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. नाव नसेल तर त्वरित नोंदणी करा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अंतिम मतदार यादी पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा. यादीत नाव तपासण्यासाठी voters.eci.gov.in या संकेत स्थळाला मतदार भेट देऊ शकतात. किंवा वोटर हेल्पलाइन हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून आपले नाव तपासू शकतात.
अनेक कारणामुळे मतदारांची नावे यावेळी वगळण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाच्या वेळी संभ्रम निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. वेळेवर ची अडचण टाळण्यासाठी यादी तपासणी गरजेचे म्हटले जात आहे.
*फक्त ४ जणांनाच प्रवेश*
नामनिर्देशनासाठी येताना उमेदवारास जास्तीत जास्त चार व्यक्ती, अशा एकूण पाच जणांच्या नामनिर्देशन कक्षात प्रवेश दिला जाणार आहे. नामनिर्देशन प्रक्रियेसाठी येताना उमेदवार रॅली आणि कार्यकर्त्यांसह येतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ नये यासाठी १०० मीटरच्या परिसरात फक्त तीन वाहनांसह उमेदवारांना प्रवेश राहील.