दिराच्या प्रेमात वहिनी झाली वेडी,अन् पतीचाच काढला काटा ! अपघात मृत्यूचा बनावट रचला, मात्र २ दिवसातच शवविच्छेदनातून फुटले बिंग

दिराच्या प्रेमात वहिनी झाली वेडी,अन् पतीचाच काढला काटा ! अपघात मृत्यूचा बनावट रचला, मात्र २ दिवसातच शवविच्छेदनातून फुटले बिंग

दिराच्या प्रेमात वहिनी झाली वेडी,अन् पतीचाच काढला काटा !

अपघात मृत्यूचा बनावट रचला, मात्र २ दिवसातच शवविच्छेदनातून फुटले बिंग

दिराच्या प्रेमात वहिनी झाली वेडी,अन् पतीचाच काढला काटा ! अपघात मृत्यूचा बनावट रचला, मात्र २ दिवसातच शवविच्छेदनातून फुटले बिंग

✍️ भवन लिल्हारे जिल्हा प्रतिनिधी भंडारा📱मो.नं.9373472847📞

अकोला : अकोल्यात एका महिलेने दिराच्या प्रेमात वेडी होऊन चक्क आपल्याच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यात पतीचा चुलत भाऊ हा सातत्यानं घरी यायचा. दरम्यान दोघांची नजरभेट झाली आणि त्यांच्यात हळूहळू संवाद वाढला. त्यातूनच जवळीकता निर्माण होऊन दोघांचं सूत जुळलं. परंतु आता पती प्रेमात अडसर ठरू लागल्यानं पत्नीनं प्रियकराच्या (दिराच्या) मदतीनं पतीला संपवलं. विशेष म्हणजे ही हत्या नसावी, अपघाती मृत्यू असल्याचा दोघांनी बनावही रचला. मात्र २ दिवसांत त्यांचे हे बिंग शवविच्छेदनातून फुटले आणि पत्नी व तिचा प्रियकर दिराला गजाआड व्हावे लागले. हे प्रकरण आहे अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील तामशी गावातले

*नेमकी काय आहे संपूर्ण घटना?*
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील रहिवासी असलेले मेसरे नामक एक जोडपं बाळापूर तालुक्यातल्या तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी आलं होतं. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे असं या दोघा पती-पत्नीचे नाव आहे. दरम्यान, इथं काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला.

या संदर्भात पत्नीनं बाळापुर पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. रात्री गाढ झोपीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला, असं मंगलाने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली आणि तपास सुरू केला. सुरुवातीला पत्नीनं सांगितलं की आपला पती दारूच्या प्रचंड आहारी गेला असून तो त्यात व्यसनाधीन झाला होता. त्यामुळे हा आकस्मित मृत्यू असावा, असे तिने पोलिसांना भासवून दिले होते. 

*वैद्यकीय अहवालात फुटलं बिंग*

दरम्यान, दोन दिवसानंतर प्रमोद यांचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यात त्याचा गळा आवळून खून केल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी या प्रकरणात धागेदोरे तपासले असता, मृत प्रमोदची पत्नी मंगला हिचे पतीचा चुलत भाऊ गोटू मेसरे याच्यासोबत प्रेमाचं सूत जुळलं असल्याचे समोर आलं. या प्रकरणात बाळापूर पोलिसांकडून दोघांचीही कसून चौकशी करता मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतले.  दरम्यान त्यांनी दोरीने गळा आवळून प्रमोदची हत्या केल्याची कबूली दिली. अखेर पोलिसांनी वहिनी आणि दिर दोघांनाही अटक करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. 

*प्रेमात अडसर ठरत असल्याने काढला काटा*

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगला आणि गोटू यांचं प्रेम खूप पुढं गेलं होतं. गोटू हा अविवाहित असून त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला लागली होती. प्रमोदनं दोघांचं भेटणं बंद केलं होतं. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा तिने निश्चय घेतला आणि अखेर त्यांनी पतीलाच संपवलं.