अखेर नानाभाऊ पटोलेची खासदारकी उमेदवारी पक्की, गोंदिया -भंडारा लोकसभा नेवडणूक लढणार.
मीडिया वार्ता न्यूज ची काँग्रेस पक्ष श्रेष्टीनी घेतली दखल.

✍️ प्रविण शेंडे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी📱मो.नं.9834486558
गोंदिया – मीडिया वार्ता न्यूज मध्ये आलेल्या बातमी ची दखल घेत काँग्रेस पक्ष श्रेष्टी नी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष तथा शेतकऱ्याचे कैवारी, लोकनेते म्हणून ओळख असलेले नानाभाऊ पटोले यांना भंडारा – गोंदिया जिल्ह्याची लोकसभा खासदारकी उमेदवारी निसश्चित करण्यात आली आहे. मीडिया वार्ता न्यूज चे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी भंडारा -गोंदिया मतदात्यांचे भावना आपल्या बातमी मध्ये वेक्त केल्या होत्या, हीं बातमी काँग्रेस पक्ष श्रेष्टी पर्यंत पोहचली. आणि त्यांनी मतदात्यांच्या भावना लक्षात घेत नानाभाऊ पटोले यांना उमेदवारी देण्याचे ठरविले. नाव जाहीर होण्यापूर्वी बरेच नेत्याचे नाव समोर येत होते. त्यामध्ये राष्ट्रवादी पवार गटाचे माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे, माजी आमदार चरणभाऊ वाघमारे, भंडारा जिल्हा महिला अध्यक्ष बोरकर ताई,अजून दोन माजी आमदारांचे नाव खूब चर्चे मध्ये होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकऱ्याच्या धोरणचा विरोध करीत शेतकऱ्याच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांचा विरोध करीत खासदारकी चा राजीनामा देणारा एकमेव खासदार म्हणून देशात नानाभाऊ ची ओळख आहे. देशातील सर्वच मंत्री, खासदार, आणि नेते हे मोदीच्या विरोधात बोलत नसताना नानाभाऊ पटोले यांनी मोदीच्या निर्णयामुळे आपला राजीनामा दिला होता. असा उमेदवार भंडारा -गोंदिया ला मिळावा अशी मतदाराची अपेक्षा होती. ती अपेक्षा मीडिया वार्ता न्यूज या दैनिक वृतपत्रानी प्रकाशित केली. आणि त्याचेच परिणाम म्हणून काँग्रेस पक्ष श्रेष्टींनी नानाभाऊ पटोले यांना उमेदवारी जवळपास निश्चित केली आहे.









