माणगाव येथे स्वदेस मित्र यांचा गुण गौरव सोहळा मोठया उत्साहात संपन्न.
✍️-नितेश पुरारकर✍️
गोरेगाव विभाग प्रतिनिधी
📞संपर्क-७०२११५८४६०.
माणगांव:-रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशन च्या वतीने माणगाव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन आणि सुधागड येथील स्वदेस फाऊंडेशन तर्फे गाव पातळी वर आरोग्याचे स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या स्वदेस मित्रांचा गुण गौरव सोहळा नुकताच माणगाव येथील गांधी मेमोरियल हॉल येथे करण्यात आला यासाठी मॅनकाइंड फार्मा कंपनीने सहकार्य केले.
रायगड जिल्ह्यामधील सात तालुक्यामध्घे ६१८ स्वदेस मित्र गावपातळी वर स्वयंस्फूर्तीने प्राथमिक आरोग्य सेवा पुरवतात व शासकीय रुग्णालयाशी समन्वय साधून आवश्यकतेनुसार रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जातात , स्वदेस फाउंडेशन च्या वतीने स्वदेस मित्रांना प्राथमिक आरोग्य सेवेसाठी प्रशिक्षित केलेले आहे .
कार्यक्रमाचे उद्घाटन स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे , मॅनकाइंड फार्मा कंपनी चे सी. एस. आर, प्रमुख श्अखिलेश डीमरी , माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गोमसाळे व शंकरा आय हॉस्पिटल चे डॉ. राजेश कापसे, तालुका आरोग्य अधिकारी महाड डॉ. नितीन बावडेकर, तालुका आरोग्य अधिकारी तळा डॉ.वंदन कुमार पाटील, तालुका आरोग्य अधिकारी म्हसळा डॉ. प्रशांत गायकवाड,तालुका आरोग्य अधिकारी सुधागड डॉ. शशिकांत मढवी, डॉ. दिपाली पुरी माणगाव यांनी केले व या सर्व पाहुण्याच्या हस्ते आरोग्य उपक्रमा मध्ये अतुलनीय आणि सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या ४२ स्वदेस मित्रांचा पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
स्वदेस फाउंडेशनच्या संस्थापक झरीना स्क्रूवाला यांनी दूरदृश्य प्रणाली द्वारे मार्गदर्शन करून पुरस्कार प्राप्त स्वदेस मित्रांचे कौतुक केले. स्वदेस फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे यांनी स्वदेस मित्रांचे कौतुक केले व गाव पातळीवर गाव विकास समिती च्या मदतीने स्वप्नातील गाव घडवण्याचे काम स्वदेस मित्राच्या सहकार्यातून अत्यंत गतीने सुरू असल्याबद्दल स्वदेस मित्राचे आभार मानले आणि आरोग्य कार्यक्रम आणखी वाढवण्याच्या उद्देशाने आगामी वर्षासाठी रूपरेषा सादर केली.
स्वदेस मित्र यांनी अत्यंत कुशलतेने मंत्रमुग्ध करणारी नृत्ये, मनमोहक नाटक आणि गाण्यांसह हा कार्यक्रम उत्साही सांस्कृतिक उपक्रमांनी पार पडला.
कार्यक्रमामध्ये महाड, माणगाव, तळा, सुधागड व म्हसळा येथील तालुका आरोग्य अधिकारी, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल, प्रशांत ऑपटिशन तळा यांना आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमासाठी स्वदेस फाउंडेशनचे संचालक रंजिश कट्टेडी, अमित गुप्ता, राहुल कटारिया, प्रदीप साठे, प्रसाद पाटील बीजोय चिरमाल, तुषार इनामदार आणि डॉ. सुरेन्द्र यादव, प्रशांती मिकायला उपस्थित होते.
कार्यक्रमासाठीएकूण ७०९ स्वदेस मित्र व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वदेस मित्र नूतन आग्रे, वरिष्ठ आरोग्य समन्वयक सुप्रिया जमखिंडे, प्राप्ती मोरे यांनी व आभार प्रदर्शन स्वदेस फाउंडेशनचे संचालक प्रदीप साठे यांनी केले कार्यक्रम यशस्वी आयोजन करण्यासाठी स्वदेस फाउंडेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक विशाल वरुटे व स्वदेस टीम यांनी विशेष परिश्रम केले.