खांडपाले येथील आजी-माजी सरपंचासह शाखाप्रमुख, गावचे अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण खांडपाले ग्रामस्थ महिला भगिनींनी केला शिवसेनेत जाहीर प्रवेश
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-लोणेरे विभाग खांडपाले गावातील प्रभारी सरपंच ज्ञानेश्वर शिगवण, माजी सरपंच शिवाजी आंबेकर, गावचे अध्यक्ष अनिल आंबेकर यांच्यासह उबाठा गटाचे शाखाप्रमुख बौद्ध वाडी गावचे अध्यक्ष विजय लोखंडे यांच्यासह उबाठा मधील संपूर्ण ग्रामस्थ महिला भगिनींनी महाड पोलादपूर माणगाव चे “कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले” यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
विकास कामे होत नसल्यामुळे संपूर्ण गावाने शिवसेनेत जाण्याचा घेतला एक मुखी निर्णय,यावेळी खांडपाले ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपली जी काही विकासकामे रखडली असतील ती आचारसंहिता संपल्याबरोबर कामाचा शुभारंभ केला जाईल तसेच आपल्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही, माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकास कामे होत आहेत महाड विधानसभा मतदारसंघाचा झपाट्याने विकास होताना दिसत आहे त्यामुळे गावेच्या गावे शिवसेनेत प्रवेश करत आहेत.यावेळी खांडपाले येथील महिला भगिनींनी पुष्पवृष्टी करत मान्यवरांचे गावात स्वागत केले.या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर महिला संघटिका नीलिमाताई घोसाळकर, प्रताप घोसाळकर , विभाग प्रमुख रवी टेंबे पंचायत समिती सदस्य महेंद्र तेडगुरे , पंकज तांबे तसेच या विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.