माणगांवातील कुंभेवाडीत सौरऊर्जेचा जागर करीत ग्रामस्थांना सौरदिव्यांची भेट

माणगांवातील कुंभेवाडीत सौरऊर्जेचा जागर करीत ग्रामस्थांना सौरदिव्यांची भेट

माणगांवातील कुंभेवाडीत सौरऊर्जेचा जागर करीत ग्रामस्थांना सौरदिव्यांची भेट

माणगांवातील कुंभेवाडीत सौरऊर्जेचा जागर करीत ग्रामस्थांना सौरदिव्यांची भेट

✍️राम भोस्तेकर✍️
पन्हलघर विभागीय प्रतिनिधी
📞 92737 01068📞

केलगन कुभे :-सह्याद्रीच्या निसर्गसुंदर दुर्गम डोंगराळ भागातील कुंभेवाडी या गावात मुंबई येथील परिज्ञान परिवार संस्थेमार्फत संस्थेचे अध्यक्ष मुंबई येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. उदय अंदार यांच्या वतिने व्यवस्थापकीय समिती सदस्य अजय नाडकर्णी आणि सदस्य तेजस जानसकर यांच्या प्रयत्नांतून माणगांवचे वन्यजीव अभ्यासक शंतनु कुवेसकर यांच्या माध्यमातून सौरऊर्जेविषयी जनजागृती करत येथील जेष्ठ ग्रामस्थांना सौरदिव्यांची खास भेट देण्यात आली.डोंगरात राहणाऱ्या आमच्यासारख्या माणसांना रात्रीच्या काळोखात पायी चालताना या दिव्यांचा खुपच उपयोग होईल व घरातही साधारणतः आठ तास दिव्यांचा वापर करता येत असल्यामुळे घरातील वीजबिल देखील कमी होईल असे येथील जेष्टांनी बोलून दाखवत, शंतनु कुवेसकर, अजय नाडकर्णी आणि परिज्ञान परिवार संस्थेचे टाळ्या वाजवुन आभार मानले.

सौर उर्जेचे हे दिवे अगदी सर्व साधारण प्रकाशात देखिल चार्जिंग होतात व वापरण्यास अत्यंत सोपे आहेत. अधुन मधून खंडित होणारी वीज अशा वेळी पटकन लावता येतात तसेच जवळपास सहा ते आठ तास व्यवस्थित प्रकाश देतात. प्रकाशमान सौरदिवे भेट मिळाल्याने दुर्गम डोंगराळ भागातील जेष्ठ ग्रामस्थांचे चेहरे समाधानाने उजळले.गेल्या पाच वर्षांमध्ये एक हजाराहून अधिक घरांमध्ये ह्या सौरदिव्यांचे वाटप व जनजागृती केल्याचे अजय नाडकर्णी यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात सौरऊर्जेचे महत्व पटवून देताना वाढती महागाई आणि भरमसाट येणारे वीजबिल यावर मात करण्यासाठी सौरऊर्जा आपल्या कशी कामी येईल ते सांगितले आहे