महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचेआजाद मैदानात बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन

महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचेआजाद मैदानात बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग :- महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांचे नेतृत्वात बेमुदत कामबंद आणि धरणे आंदोलन दिनांक २० मार्च २०२५ पासून आझाद मैदान मुंबई येथे सुरू आहे.
या धरणे आंदोलना मध्ये पुढील प्रमुख मागण्या आहेत त्यात महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळावा, ग्राम महसूल अधिकारी व महसूल सहाय्यक संवर्गात ५०% आरक्षण देण्यात यावे,सेवानिवृत्त महसूल सेवकांना १० लाख रुपये सेवानिवृत्ती वेतन मिळावे,दिनांक ०७ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०% मानधन वाढ चालू आर्थिक वर्षात लागू करावी,पदोन्नती कोटा ४०% ऐवजी १००% करण्यात यावा अश्या मागण्या आहेत.
या वेळी संघटने चे इतर पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले आहेत.