आरोग्य तपासणीने क्षात्रैक्य समाजाचा रौप्यमहोत्सव साजरा

आरोग्य तपासणीने क्षात्रैक्य समाजाचा रौप्यमहोत्सव साजरा

रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- येथील क्षात्रैक्य समाज संस्था, लायन्स क्लब, अलिबाग आणि ‘दोस्त’ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि भव्य आरोग्य तपासणी शिबिर भरवण्यात आले. कुरुळयेथील भव्य वातानुकूलित क्षात्रैक्य समाज सभागृहात पोटाचे आजार, शौचाशी निगडित समस्या, पोटातील कर्करोग, यकृत, पित्ताशय, किडनी यांच्याशी निगडित समस्या,शल्यचिकित्सा, हर्निया, स्तन,थायरॉइडच्या समस्या,शरीरावरील गाठी, पायांचे दुखणे, व्हेरिकोज व्हेन्स,बीपी आणि जनरल चेकअप यासह तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने मोफत वैद्यकीय उपचार आणि औषधे देण्यात आली. यामध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता असणाऱ्या तसेच मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा हे नेत्रविकार आढळलेल्या रुग्णांना पुढील मोफत उपचारासाठी संदर्भित करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये क्षात्रैक्य समाज अध्यक्ष द्वारकानाथ नाईक,जिल्हा उपप्रांतपाल प्रवीण सरनाईक, लायन्स अध्यक्ष ॲड गौरी म्हात्रे, सचिव महेश कवळे, खजिनदार अंकिता म्हात्रे , आरसी विजय वनगे ,फर्स्ट व्हीपी तथा क्षात्रैक्य समाज सचिव प्रदीप नाईक, रवींद्र वर्तक,अविनाश राऊळ, श्रीनाथ कवळे, मनोज राऊळ, तुषार नाईक, अतुल वर्तक,गिरीश म्हात्रे ,जगदीश कवळे, रमेश पाटील ,सुरेंद्र नागलेकर,ॲड प्रसाद पाटील,जगदीश कवळे, रमेश नाईक, प्रकाश पाटील, संजय माळी, संतोष पाटील, महेंद्र पाटील,शैलेश घरत, ॲड भूपेंद्र पाटील, प्रकाश देशमुख यांसह डॉ शुभदा कुडतलकर, डॉ कांचन माळवी, त्यांचा संपूर्ण वैद्यकीय स्टाफ, दोस्त मुंबईचे पीआरओ श्रीकांत गावीत उपस्थित होते. या मोफत नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिराचा १८७ गरजू रुग्णांनी लाभ घेतला. तज्ज्ञांकडून तपासणी आणि मोफत औषधोपचार उपलब्ध झाल्याने अनेक रुग्णांनी समाधान व्यक्त करुन, अशाप्रकारची आरोग्य शिबिरे वारंवार व्हावीत अशी माफक अपेक्षा व्यक्त केली.