लखपत (गुजरात) ते कन्याकुमारी येथे सुरू झालेला देशातील पहिला
‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ चे रायगड येथे आगमन.
✍️सचिन पवार ✍️
कोकण ब्युरो चीफ
📞8080092301📞
रायगड :-‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेली केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सायकल रॅली चे माणगावात आगमन..रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात ‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेली सायकल रॅली माणगाव पोलीस ठाणे हद्दीत सकाळी ८.३० वाजता आगमन झाले.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कडून ७ मार्च रोजी लखपत (गुजरात) ते कन्याकुमारी येथे सुरू झालेला देशातील पहिला ‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ असा उपक्रम आहे.’सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या थीम अंतर्गत, या रॅलीचे उद्दिष्ट किनारी भागात राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करणे, ड्रग्ज, शस्त्रे आणि स्फोटकांसह तस्करीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकणे हा आहे.केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या ५६ व्या वर्धापन दिना निमित्त गुजरात येथील लखपत किल्ला येथून सुरू झालेली श्री राममूर्ती असिस्टंट कमांडर यांचे नेतृत्वाखाली ५० सायकल स्वार यांची ‘समृद्ध तट समृद्ध भारत’ हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू असलेली सायकल रॅली माणगाव पोलीस ठाणे हद्दीत आगमन झाले.
३१ मार्च रोजी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात समारोप करण्यापूर्वी सायकलस्वार मुंबई, कोकण, गोवा, हल्दिया, कोणार्क, विशाखापट्टणम, चेन्नई आणि पाँडिचेरी यासारख्या प्रमुख किनारी शहरांमधून प्रवास करणार आहेत.यावेळी सदर यात्रेचे स्वागत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. निवृत्ती बोराडे, मसपोनी श्रीमती लाड, वाहतूक शाखा यांनी केले.काही वेळाने सायकल स्वार पुढील यात्रेसाठी रवाना झाले आहेत.सदर वेळी योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला पाहायला मिळाले.