माजी आमदार डॉ रायमूलकरांनी एकेरी भाषेचा उल्लेख टाळावा अन्यथा शिवसेना स्टाईल उत्तर मिळेल
प्रा. गजेंद्र गवई
मेहकर /प्रतिनिधी: दिनांक 15 मार्च 2026 रोजी वडाळी येथील नव युवकांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उपजिल्हाप्रमुख प्रा आशिष रहाटे व देऊळगाव साखर्षा येथिल सर्कल प्रमुख पंडित बापू यांव्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेतला होता तो प्रवेश खराच असे श्याम पाटील निकम मेहकर तालुका संघटक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला.

या बाबत सविस्तर असे की माजी आमदार डॉ रायमूलकर यांनी पत्रकार परिषद घेऊन वडाळी येथिल युवकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बळजबरीने प्रवेश करुन घेतल्याचा दावा केला होता मात्र आज दिनांक 20 मार्च रोजी जनसंवाद कार्यालय मेहकर येथे शिवसेना( उबाठा ) तालुका संघटक श्याम पाटील निकम व दत्ताभाऊ घनवट, देऊळगाव साखर्षा सर्कल प्रमुख पंडित बापू देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन माजी आमदाराचा दावा फोल ठरवला,तसेस माजी आमदार हे नेहमी पत्रकार परिषद मधून आमचे नेते आमदार सिद्धार्थ खरात यांच्या बद्दल एकेरी भाषेचा उल्लेख करतात त्यांनी तो टाळावा अन्यथा त्यांना त्यांच्या भाषेत अरे ला कारे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या स्टाईल मध्ये उत्तर दिल्या जाईल असा इशारा सुद्धा श्याम पाटील निकम यांनी पत्रकार परिषदे द्वारे दिला.
तसेच पंधरा वर्ष तुम्हांला निवडून दिले तेंव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याकडे डोकावले सुद्धा नाही महाराजांच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष केले एकही पुतळा बसविला नाही आणि आता म्हणतात 64 पुतळे बसविले मग हा पैसा आला कुठून आणि आत्ताच का पुतळे बसविन्याचा घाट का?असा प्रश्न उपस्थित करुन हे त्यांचे महाराजांच्या आडून राजकारण असल्याचे सांगितले,तसेच त्यांनी आणलेले कामे किती पूर्ण झाले त्यांच्या काळात त्यांनी केले नाहीत केवळ कागदोपत्री कामे करायचे आणि आपले घरे भरायचे हे त्यांचे धंदे होते म्हणून त्यांना जनतेने दाखून दिले आहे, आता आपले आमदार शेतकरी, कष्टकरी, लघु व्यापारी, लोणार विकास आराखडा,शेतकऱ्यांच्या हिताचे शेत रस्ते पांदण रस्ते, स्मशान भूमी, शाळा, अंगणवाडी, शिक्षण, बेरोजगार यावर विधानसभेत आवाज उठवत आहे त्यामुळे त्यांच्या पोटात पोटसूळ उठत असल्याचे सांगितले व आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांच्या माध्यमातून वडाळी गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यात येणार असून तात्पुरती सेवा म्हणून जर पंचायत समितीने टँकर उपलब्ध करुन दिल्यास माझ्या विहिरीवरुन मोफत पिण्याचे पाणी पुरवणार असल्याची माहितीही श्याम पाटील यांनी दिली.

या बाबतीत त्यांनी पाच दिवस अगोदर पंचायत समीतकडे प्रस्ताव टाकला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले, यावेळी वडाळी येथील सुरेश शिंदे, महादेव जटाळे , प्रवीण धंदरे, शिवराज गायकवाड,ज्ञानेश्वर शिंदे, महेश धंदरे, ज्ञानेश्वर लठाड,विशाल गडदे,सोमनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.









