नाशिक मनपा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळतीप्रकरण २२ रुग्णांचा मृत्यू .

47

नाशिक मनपा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळतीप्रकरण २२ रुग्णांचा मृत्यू .

मृतांच्‍या नातेवाईकांना नाशिक मनपाकडूनही ५ लाखांची मदत जाहीर.

नाशिक मनपा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळतीप्रकरण २२ रुग्णांचा मृत्यू .
नाशिक मनपा रुग्णालयात ऑक्‍सिजन गळतीप्रकरण २२ रुग्णांचा मृत्यू .

नाशिक(प्रतिनिधी)21:- शहरातील मनपाचं डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यामुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. याठिकाणी ऑक्सिजनच्या टाकीमधून गळती होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती अचानक खालावली. या दुर्घटनेतील जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नाशिकमधील ऑक्सिजन गळती दुर्घटनेत  २२ रुग्णांना प्राण गमवावे लागले असून ११ पुरुष आणि ११ महिलांचा समावेश आहे. १५७ रुग्णांपैकी ६३ रुग्ण हे अत्यवस्थ होते. मृतांमध्ये ११ रुग्ण हे ऑक्सिजनवर तर ११ रुग्ण हे व्हेंटिलेटरवर होते, अशी ही माहिती भुजबळ यांनी दिली.

झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये आज सकाळच्या सुमारास मोठ्या ऑक्सिजन टाकीचा कॉक नांदुरुस्त असल्याने त्यातून गळती सुरू झाली. ही गळती रोखण्यासाठी जेव्हा तंत्रज्ञ कारागीर दाखल झाले त्यावेळेस दुरुस्तीचे काम सुरू असताना ऑक्सिजन टाकीचा नादुरुस्त असलेला कॉक पूर्णपणे तुटला. नवीन कॉक बसवून गळती थांबविण्यासाठी २ तासांचा कालावधी लोटला. तोपर्यंत ऑक्सिजन टाकी रिकामी झाली होती. दुपारी २ वाजता पर्यायी टॅंकर पुरविला गेला त्याद्वारे टाकी भरण्यात आली.

या २ तासाच्या कालावधीत हॉस्पिटलमधील ऑक्सिजन पुरवठाचा दाब पूर्णपणे कमी झाला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण हे एका पाठोपाठ दगावण्यास सुरुवात झाली. तब्बल २२ रुग्ण या दुर्घटनेत दगावल्याची माहिती जिल्हा अधिकारी सुरज मांढरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. या दुर्दैवी घटनेची संपूर्णपणे चौकशी केली जाईल आणि दोषी असणार्‍यांवर कारवाई करणार असल्याचंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.