“ब्लड फॉर महाराष्ट्र” राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी चमोर्शी तर्फे भव्य रक्तदान शिबिर.
“ब्लड फॉर महाराष्ट्र” अभियान 15 रक्तदात्यांनी केले रक्तदान.
✒मनोज खोब्रागडे✒
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी):- राष्ट्रवादी युवक काँग्रेस चामोर्शीचे तालुका अध्यक्ष नेमाजी घोगरे, अतुल बारसागडे सदस्य ग्रामपंचायत लखमापूर बोरी, वैशाली रवींद्र पीपरे सदस्या ग्रामपंचायत लखमापूर बोरी. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे “ब्लड फॉर महाराष्ट्र” अभियान आयोजित लखमापूर बोरी येथे भगवतराव हायस्कूल ज्युनियर कॉलेज लखमापूर बोरी येथे घेण्यात आले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसने वाढत्या महामारीला मात करण्यासाठी “ब्लड फॉर महाराष्ट्र” अभियान राबवण्यात आले. परिस्थिती लक्षात घेऊन 12 रक्तदात्याणी रक्तदान केले. रामकृष्ण झाडे, किशोर नागापुरे, अतुल बारसागडे सदस्य ग्रामपंचायत लखमापूर बोरी, श्रीकृष्ण वैरागडे, मंगेश वासेकर, श्रीकृष्ण बारसागडे, साईनाथ सातपुते, दिलकुश बोधलकर, श्रीकृष्ण बोधलकर रक्त पेठी चमू अंजली साखरे बीडीओ, सतीस तटकलावार, स्वप्नील चापले तंत्रज्ञ, सूरज चांदेकर, प्रमोद देशमुख यावेळी भगवतरव हसकुल कर्मचारी, शिवणकर सर, वाळके सर, शेंडे सर, छत्रपती बोरीकर, वणेवार, गुणाकार गुडपले, बहिरेवर, अवत्रे उपस्थित होते.