आ. समीर कुणावार यांनी घेतला हिंगणघाट तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा.
आ. समीर कुणावार यांनी घेतला हिंगणघाट तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा.

आ. समीर कुणावार यांनी घेतला हिंगणघाट तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा.

आ. समीर कुणावार यांनी घेतला हिंगणघाट तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा.
आ. समीर कुणावार यांनी घेतला हिंगणघाट तालुक्यातील कोरोना महामारीचा आढावा.

प्रा. अक्षय पेटकर,प्रतिनिधी ✒
हिंगणघाट,दि.20:- हिंगणघाट तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आमदार समीरभाऊ कुणावार यांनी तातडीने यांच्या अध्यक्षतेखाली आज हिंगणघाट तालुक्याचा कोरणा आढावा बैठक उप-विभागीय जिल्हाधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे घेण्यात आली.

आजच्या बैठकीमध्ये हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त पेशंट आहे त्यांचा आढावा घेण्यात आला त्याच प्रमाणे त्यांना औषधोपचार ऑक्सीजन विषयी सुद्धा पूर्ण आढावा घेतला या संबंधित पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट मिळावी याबाबत आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील तसेच हिंगणघाट शहरातील कोरोणटाईन आहे त्यांना पूर्ण औषध उपचार मिळावा आणि प्रोटोकॉल प्रमाणे औषधी मिळावी याबद्दलही आढावा घेण्यात आला. आणि ती जर औषधी त्यांना मिळाली तर ते ठीक होतील ते जर ठीक झाले तर पुढे त्यांची तब्येत वाढणार नाही. व्हॅक्सिनेशन इंजेक्शन चा पुरेपुर पुरवठा व्हावा, वॅक्सिंन सर्व नागरिकांना मिळावी याकरिता सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

हिंगणघाट येथील रुग्णालयांमध्ये आमदार निधीतून 50 बेड ची निर्मिती केली पण आता दिवसेंदिवस पेशंट वाढत असल्यामुळे तिथे ऑक्सिजन साठा कमी पडत आहे, म्हणून या संदर्भामध्ये ऑक्सीजन सिलेंडर कसे उपलब्ध होईल यासाठी सुद्धा प्रयत्न करण्याचे ठरले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात तील कोरोन टाईन सेंटर आहे, त्यांना औषधोपचार मिळतो की नाही याबाबत आढावा घेतला. त्यांना काय मदत करता येईल याबाबत सुद्धा सूचना देण्यात आल्या.

हिंगणघाट शहरात जे व्यक्ती विनाकारण फिरतात तसेच हिंगणघाट शहर व ग्रामीण भागात लग्न समारंभ होतात ज्या कार्यक्रमात अनेक लोक जमा होतात असे कार्यक्रम होऊ देऊ नये याबाबत प्रशासनाने व पोलिसांनी काळजीने लक्ष द्यावे याबाबत सुद्धा आ. समीर कुणावार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

दिवसेंदिवस कोरोणाचे संक्रमण वाढतच चालले असून हिंगणघाट तालुक्यात मोठ्या प्रमाणात पेशंट दिसून आलेले आहे. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे असे आवाहन आ. समीर कुणावार यांनी केले. यावेळी प्रत्येक नागरिकांचा जीव वाचला पाहिजे याकरिता प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी अशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या. सदर बैठकीमध्ये हिंगणघाट, समुद्रपूर तालुक्याचे उप-विभागीय अधिकारी चंद्रभानजी खंडाईत, तहसीलदार श्रीरामजी मुंधडा, हिंगणघाट शहराचे नगराध्यक्ष प्रेम बसंतनी, नगर परिषद सदस्या सौ. शुभांगी डोंगरे, हिंगणघाट नगर परिषदेचे मुख्याधिकारी जगताप, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, DYSP  दिनेशजी कदम, हिंगणघाटचे ठाणेदार संपत चव्हाण, हिंगणघाट उप-जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी डॉ. चाचरकर, हिंगणघाट तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किर्तीताई कुचेवार इत्यादी प्रशासकीय अधिकारी व उप-जिल्हा रुग्णालयाचे शिष्टमंडळ सदर बैठकीला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here