गडचिरोली जिल्हात खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.
गडचिरोली जिल्हात खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.

गडचिरोली जिल्हात खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.

जिल्हयातील बँकाच्या वेळेतही बदल, राज्य शासनाच्या नवीन निर्देशा नूसार जिल्हाधिकारी यांचे आदेश

गडचिरोली जिल्हात खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.
गडचिरोली जिल्हात खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू.

✒️मनोज खोब्रागडे✒️
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि.20 (जिमाका):- राज्य शासनाच्या नवीन आदेशामधील तरतुदीच्याण अनुषंगाने गडचिरोली जिल्हात आता खाद्यान्न दुकाने सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंतच राहणार सुरू राहणार असल्याबाबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली यांनी मिशन ब्रेक द चैन अंतर्गत अंतर्गत नवीन आदेश 20 एप्रिल रोली निर्गमित केले आहेत. यामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या बाबींना यात किराणामालाची दुकाने, भाजीपाल्याची दुकाने, फळविक्रेते, दूधपुरवठा केंद्रे (दुग्धशाळा), बेकरी, मिठाईची दुकाने, पशुखाद्य दुकाने (चिकन, मटन, पोल्ट्री, मासे, अंडी इ.), कृषी संबंधित दुकाने, पावसाळ्याकरिता लागणारे साहित्य व इतर सर्व प्रकारची खाद्यान्न दुकाने इत्यादी सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 वाजेपर्यंत या कालावधीत दुकाने/सेवा सुरु ठेवण्याची अनुमती असणार आहे.

आरोग्य सेवा, रूग्णालये, मेडिकल, इत्यादींना सदर वेळेचे बंधन लागु राहणार नाही. या वेळेशिवाय वैध कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही व्यक्तीला ये-जा करता येणार नाही. अपवादात्मक परिस्थितीत औषधे घेण्याकरीता जायचे असल्यास सोबत वैध औषधोपचार चिठ्ठी सोबत असणे आवश्यक राहील. सदर शासन आदेशातील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देंशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक असेल. सदरील आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. हे आदेश दिनांक 20.04.2021 चे रात्री 8.00 वाजेपासून लागू करण्यात येत असून सदरचा आदेश दिनांक ०१ मे, २०२१ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत अंमलात राहतील.

जिल्हयातील बँकाच्या वेळेतही बदल : जिल्हयातील सर्व बँकांची ग्राहक सेवा व व्यवहार जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशा नूसार सकाळी 10.00 वा.पासून ते दुपारी 3.00 वा.पर्यंतच सुरू असतील. याबात सर्व बँक ग्राहाकंनी नोंद घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here