हैवान झाला बाप. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी केल अस काही, हादरलं यवतमाळ.
हैवान झाला बाप. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी केल अस काही, हादरलं यवतमाळ.

हैवान झाला बाप. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी केल अस काही, हादरलं यवतमाळ.

हैवान झाला बाप. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी केल अस काही, हादरलं यवतमाळ.
हैवान झाला बाप. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी केल अस काही, हादरलं यवतमाळ.

✒साहिल महाजन यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी ✒
यवतमाळ,दि.20 एप्रिल:- यवतमाळ जिल्हात थरकाप उडवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. या मनहेलावणा-या घटने सर्वीकडे संतापाची लाट आहे. यवतमाळ येथे स्वताःच्या पोटच्या 28 वर्षीय मुलीचा हत्या केली आणि मुलीने आत्महत्या केल्याच भासवून पोलिसांना दिशाभुल करण्यात आल्याच समोर आल आहे. पण पोलिसांचा समयसुचकते मुळे 72 तासात या गंभीर गुन्हाचा शोध लागला.

आज काल लोकांचे मस्तक हे क्राईम सिरियल चित्रपट बघुन तसेच करत असल्याचे माघिल अनेक घटना वरुन समोर येत असते. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील केळापुर तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत मृतावस्थेत सापडलेल्या मुलीने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा खळबळजनक भांडाफोड केला. आणि हैवान बापाचा क्रूर चेहरा सर्वा समोर आला. 28 वर्षिय रेखाच्या डाव्या हाताला एका कापडी पिशवीत बांधलेली एक चिठ्ठी आणि जिओ कंपनीचं सीमकार्ड मिळालं होतं. त्यानंतर, रेखाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलीस तपास करताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृतक रेखाचा गळा आवळून हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत टाकल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यानुसार पोलीसांनी अज्ञात आरोपीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन कलम 302, 201 अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

तिन्ही आरोपींनी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी ही हत्या केली होती. आरोपी विलास मरापे यानी रेखाला पेंढरी शेत शिवारात नेलं. सोबत आणलेल्या दोरीने गळा आवळून तिची हत्या केली. आपल्यावर संशय येऊ नये म्हणून तिच्या हस्ताक्षरात लिहिलेली चिठ्ठी तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून दिलं. पुरावे नष्ट करत खुनाची घटना घडलीच नाही, अशी नाट्यमय परिस्थिती त्यांनी निर्माण केली. दोन दिवस ते आपले नियमित काम करत राहिले. मात्र, पांढरकवडा पोलिसांनी तपास करून खुनाचा 72 तासात छडा लावला.

दरम्यान, ही हत्या झाल्याची खात्री पटल्यानं संशयित म्हणून रेखाचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे, मेहुणा सुभाष मडावी यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना अटक करुन 16 एप्रिल रोजी न्यायालयाकडून अधिक तपासासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं विचारपूस केली. तेव्हा हा गुन्हा आपणच केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here