लोहिया विद्यालयात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र.
लोहिया विद्यालयात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र.
लोहिया विद्यालयात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र.
लोहिया विद्यालयात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र.
लोहिया विद्यालयात कोरोना बाधीत रुग्णांसाठी विलगिकरण केंद्र.
️गोपाल अग्रवाल, सडक अर्जुनी तालुका प्रतिनिधी️ 
सौंदड,दि.21 एप्रिल:- रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा सौंदड येथे जगदीश लोहिया – संस्थापक – संस्थाध्यक्ष, लोहिया शिक्षण संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य मधुसूदन अग्रवाल, पर्यवेक्षिका सौ. कल्पना काळे , मुख्याध्यापक मनोज शिंदे यांनी  विलगिकरण कक्षासाठी आवश्यक सोयी-सुविधासह इमारत उपलब्ध करून दिल्या आहेत. 
             
सौंदड गावात कोरोना बाधित रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून काही कोरोनाबाधित रुग्णदेखील  या साथरोगामुळे दगावले आहेत. यावर प्रतिबंधासाठी मा.गायत्रीताई इरले-सरपंच तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन समिती,सौंदड यांच्या अध्यक्षतेखाली  आपत्ती व्यवस्थापन समितीची  सभा  दिनांक १६ एप्रिल २०२१ ला ग्राम पंचायत कार्यालय सौंदड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मा.जगदीश लोहिया   संस्थापक-संस्थाध्यक्ष ,लोहिया शिक्षण संस्था, सौंदड यांनी कोरोनाच्या या भयावह दुसऱ्या लाटेच्या संकटात सर्व गावकऱ्यांच्या समस्यांचा जाणिवेतून स्वयंप्रेरणेने विलगीकरण  केंद्रासाठी संस्थेअंतर्गत विद्यालयाच्या सर्व भौतिक सुविधायुक्त प्रशस्त इमारती उपलब्ध करून देण्याबाबत सभेत आपली इच्छा व्यक्त केली. यावेळी मा.आर.डी.देशमुख-ग्राम विस्तार अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.
यानंतर मा.तहसीलदार,सडक अर्जुनी यांचे कोरोना बाधीत रुग्णांना विलगिकरनासाठी शाळेची इमारत उपलब्ध करण्याबाबतचे पत्र निदर्शनात आले आहे. त्यानुसार  रुग्णांना सोयीसाठी इमारतीची स्वच्छता करून विलगिकरणासाठी इमारत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 
       
याप्रमाणेच कोविड-१९ साथरोगाच्या च्या पहिल्या लाटेत देखील मा.जगदीश लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेअंतर्गत विद्यालयांत दि.१७ मे ,२०२० ते ,९ जून २०२० या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन समिती,सौंदडच्या मागणीनुसार विद्यालयाच्या  इमारती  सर्व सोयी-सुविधांसह उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे समाजऋनांची उतराई तसेच राष्ट्रहित तसेच समाजहिताच्या प्रत्येक कार्यात अग्रेसर राहून मा.जगदीश लोहिया नेहमीच आपले योगदान देत असल्यामुळे संस्थेतर्गत कर्मचारीही प्रेरणा घेऊन नेहमीच कठीण परिस्थितीतही पुढे येऊन कार्य करीत असतात.