समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा 'गाव तिथे शाखा' उपक्रम.
समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा 'गाव तिथे शाखा' उपक्रम.

समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम.

समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा 'गाव तिथे शाखा' उपक्रम.
समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटचा ‘गाव तिथे शाखा’ उपक्रम.

प्रशांत जगताप, प्रतिनिधी✒
वर्धा:- समता सैनिक दल वर्धा जिल्हा युनिटद्वारे गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक, विहार तिथे वाचनालय, या अभियानांतर्गत समता सैनिक दलाची शाखा स्थापन करण्यासंदर्भात डांगे ले आउट,वार्ड नंबर-३ ,जय भीम बुद्ध विहार, सिदी मेघे येथे नुकतीच कोरोनाच्या नियमाचे पालन करीत सभा संपन्न झाली.

यावेळी विचार मंचावर सभेचे अध्यक्ष म्हणून वर्धा जिल्हा संघटक मार्शल अभय कुंभारे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा सह-संघटक अविनाश गायकवाड,जिल्हा संरक्षण विभाग प्रमुख मार्शल प्रदीप कांबळे,तालुका संघटक मनोज थुल प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हा संघटक अभय कुंभारे व उपस्थित मान्यवरांनी समता सैनिक दलात सामील होऊन संघटनेला मजबुत बनविण्याचे आवाहन केले.

सदर सभेला जिल्हा बौद्धिक प्रमुख नारायण मून, जिल्हा समन्वयक गौतम देशभ्रतार, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी मधुर येसनकर, मार्शल अमोल ताकसांडे, मार्शल चंदू भगत, मार्शल रोशन कांबळे, मार्शल हर्षल गजभीये, ज्येष्ठ मार्गदर्शक पुंडलीकराव गाडगे, टेंभरे साहेब, पहलवान मार्शल मारोतराव डंभारे,मार्शल दिगांबर लांबे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पत्रकार संघाचे सचिव प्रदीप भगत मार्शल विनय गौरखेडे मार्शल गणवीर, मार्शल आगलावे, मार्शल गोपाळा, मार्शल अतुल अवथरे, मार्शल रणजित कांबळे मार्शल रोशन कांबळे आदी बौद्ध बांधव तसेच गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here