नित्यानंद सेवा परिवारातर्फे पक्षांकारिता पर्यावरणपूरक असे अनोखे रिक्षा चिमणी घरटे उभारण्यात आले.

नित्यानंद सेवा परिवारातर्फे पक्षांकारिता पर्यावरणपूरक असे अनोखे रिक्षा चिमणी घरटे उभारण्यात आले.

नित्यानंद सेवा परिवारातर्फे पक्षांकारिता पर्यावरणपूरक असे अनोखे रिक्षा चिमणी घरटे उभारण्यात आले.

✍ पूनम पाटगावे✍
जोगेश्वरी नगर प्रतिनिधी
81497 34385

जोगेश्वरी :- जोगेश्वरीतील नित्यानंद सेवा मंडळ , नित्यानंद चौक, आनंद नगर, जोगेश्वरी पूर्व येथे पक्षांकारिता विभीन्न कलाकृतियुक्त असे चिमणी घर बनवण्यात आले. ऐन उन्हाच्या दिवसात पक्षांनादेखील थंडावा मिळावा या उद्देशाने नित्यानंद सेवा मंडळातर्फे हा स्तुत्य असा उपक्रम राबवला जात आहे.
नित्यानंद चौक, आनंद नगर येथे काही वर्षांपासून बेवारस, नादुरुस्त एक रिक्षा पडून होती. काही विकृत माणसांनी रिक्षाचा वापर कचरा, खरकटे, दारूच्या बाटली टाकण्यासाठी केला. हीच रिक्षा उचलण्यासाठी नित्यानंद परिवाराने खूप प्रयत्न केले, परंतु ते शक्य झाले नाही. नित्यानंद परिवाराच्यावतीने शेवटचा पर्याय म्हणून ही रिक्षा साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली.
रिक्षा साफसफाईनंतर नित्यानंद परिवाराला या रिक्षाची एक कल्पना सुचली आणि कल्पनेचे रूपांतर तेथील मित्रपरिवाराच्या मदतीने या रिक्षाचा चिमणी घर स्वरूपात कायापालट केला गेला. या रिक्षामध्ये विविध रंगीबेरंगी पक्षी ठेवण्यात आले. या रिक्षाला ‘रिक्षा चिमणी घर’ असे नाव देण्यात आले. या रिक्षा चिमणी घराला अतिशय सुंदर आणि कल्पक अशा कलाकृतीनी सजवण्यात आले.
रिक्षाला पक्षांना हवेशीर अशी जाळी लावण्यात आली. पक्षांना उभे राहण्यासाठी स्टॅंडची व्यवस्था करण्यात आली. तसेच पक्षांना पाणी पिण्यासाठी थंडगार माठही ठेवण्यात आला. रिक्षाला वरून छत म्हणून नक्षीदार अशी झालर घालण्यात आली. रिक्षाच्या सभोवतली हिरवीगार झाडे लावण्यात आली. तसेच या रिक्षाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही रिक्षा सी. सी. टीव्हीच्या नियंत्रण कक्षेत ठेवण्यात आली आहे. नित्यानंद परिवारातील सदस्यांनी आपला परिसर स्वच्छ सुंदर दिसावा म्हणून पहाटे चारवाजेपर्येंत परिश्रम घेतले. हे अनोखे असे रिक्षा चिमणी घर सर्वांना पाहता यावे म्हणून जेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. नित्यानंद सेवा मंडळाने एन उन्हाळ्याच्या दिवसात पक्षांकारिता केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद आणि सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here