श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री प्रमोद डी बाबर साहेब यांची बदली

रशाद करदमे
श्रीवर्धन कोकण प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्युज 
 907533354

श्रीवर्धन पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री प्रमोद डी बाबर साहेब (पीआय) यांची उद्या 21 एप्रिल 2022 रोजी रोहा येथे बदली झाली आहे. सर्वांना माहीत आहे की, प्रेमळ आणि हसमुख व्यतिमत्व म्हणून नेहमी चर्चेत असणारे नाव आहे . त्यांनी कधीही कोणत्याही धर्माचा पक्षपात केला नाही. लोकांना नेहमी सोबत घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न केला. अगदी कठीण आणि गंभीर समस्या सुद्धा त्यांनी सामंजस्यानी सोडवल्या.

गरीब आणि श्रीमंत यांच्यात कधी ही पक्ष पात केला नाही सर्वांनाच समान वागणूक दिली. त्या मुळेच श्रीवर्धन मध्ये सर्व सण उत्सव आनंदात होत होते. अगदी नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोव्हीड सारखी महामारी असो साहेबांनी नेहमी सर्वांनाच आपुलकी आणि माणुसकी च्या नात्याने मदत केली.

या ट्रेंडिंग बातम्या आपण वाचलात का?

 

आपल्या पदाचा कधी ही गर्व न करता त्यांनी सर्व सामान्यांच्या सुद्धा सुख – दुःखात नेहमी सहभाग घेतला. खेळाडू असो किंवा एखादा हुशार विद्यार्थी असो त्यांना नेहमी प्रोत्साहन दिले. आणि कायम त्यांचा पाठीशी उभे राहिले. साहेब लहान मोठ्याच्या मनात एक प्रेमळ आणि आदर्श म्हणून कायम लक्षात राहतील. साहेबांच्या भावी प्रयत्नांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here