डॉ. आंबेडकरांना पुजण्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करा नीरज पटेल यांचे प्रतिपादन, गोंदियात बाबासाहेबांची ऐतिहासिक जयंती

65

डॉ. आंबेडकरांना पूजन्यापेक्षा त्यांचे विचार आत्मसात करा नीरज पटेल यांचे प्रतिपादन, गोंदियात बाबासाहेबांची ऐतिहासिक जयंती.

राजेन्द्र मेश्राम

गोंदिया जिल्हा प्रतिनिधी 

मो: 9420513193

गोंदिया ता.15:-डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना पूजन्यापेक्षा त्यांच्या मार्गावर चालून त्यांचे विचार आत्मसात करा असे आवाहन नॅशनल जन्मतचे संपादक नीरज पटेल यांनी (ता.14) केले.येथील सुभाष शाळेच्या मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्व. सामाजिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नानाजी शेंडे हे होते. मंचावर राष्ट्रमाता सवित्रीमाई फुले महासभेच्या अध्यक्ष दीदी निर्देशसिंग, आदिवासी समाजाचे प्रतिनिधी दुर्गाप्रसाद कोकोडे यांच्यासह सर्वच समाजाचे कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते.

श्री पटेल पुढे म्हणाले की संपूर्ण देश हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्य घटनेवर चालतो., तेव्हा आपणही बुद्धीवादी आणि तर्कवादि बना असे आवाहन त्यांनी केलं. यावेळी दीदी निर्देश सिंग आणि उपस्थित मान्यवरांनी समायोजित विचार मांडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.13 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर केक कापून आणि फटाक्याच्या लड्या फोडून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं.शहरात रॅली काढून बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित विविध देखाव्यांचे प्रदर्शन घडवीण्यात आले. तरुण तरुणीनी भीमगीतांवार ठेके धरले. दरम्यान जयंती समारंभात समाजातील नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये

सहयोग ग्रुपच्या शीतल रामादे, डॉ. शिल्पा मेश्राम, इंजि. उमेश नागदेवे, पोलीस निरीक्षक तेजेंद्र मेश्राम,उपायुक्त संजय थुल आणि रमेश कुकूटकर यांचा समावेश आहे.उल्लेखनीय असे की गेल्या 20 वर्षांपासून शहरात होत असलेल्या दोन जयंती कार्यक्रमाचे भविष्यात एकत्रिकरण करण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला आहे.दोन्ही अध्यक्ष ज्यामध्ये नानाजी शेंडे आणि अक्षय वासनिक यांनी एकत्रित येऊन हा निर्धार केला आहे.दरम्यान 

दुसऱ्या दिवसी ता.15 रोजी सामाजिक प्रबोधनपर कॅडर कॅम्पचे आयोजन करून

 नागपूरचे इंजि. गोपाल खांबाळकर यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी प्राथमिक ते पदविधर विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येऊन याचा लाभ शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला.या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण अधिकारी संजय गणवीर, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, जिल्हा संख्यिकी अधिकारी रुपेश राऊत यांनी मार्गदर्शन केलं. सवित्रीमाई फुले विचारमंच आणि संथागार महिला विंग च्या महिलांनी ‘सूर्याची सावली -रमाई माऊली’ या नाटीकेचे जोरदार सादरीकरण केलं. हे सादरीकरण पाहून दर्शक मंत्रमुग्ध झाले होते.जयंतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी युनिफॉर्म ड्रेसकोड परिधान करून जयंतीचे शिस्तबद्ध संचलन केलं त्याचे कौतुक करण्यात आलं. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दर्शना वासनिक आणि वैशाली खोब्रागडे यांनी केले तर सहयोग ग्रुपचे सीईओ विलास वासनिक यांनी आभार मानले.