नेरळ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; १ किलोच्या वर गांजा हस्तगत
✒️संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
📞९०१११९९३३३
नेरळ : – फिर्यादी राजेश केकाण (पोलीस शिपाई १८३६) यानी नेरळ पोलीस ठाण्यात खबर दिली की, मौजे बलवरे येथील शिव मंदिराजवळ एक इसम अंमलीपदार्थ विकण्यासाठी आला आहे. त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक टीम तयार करून सरगर यांना त्याचे नेतृव दिले व त्या अनुषगाने नेरळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक १७ एप्रिल रोजी २२.३० च्या सुमारास मौजे बलवरे गावचे हददीत शिवमंदिर जवळील आंब्याचे झाडाचे जवळ ता.कर्जत येथे आरोपीची झडती घेतली असता उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. आरोपी गणेश वळकु मार्के वय ३८ वर्षे रा.जांभुर्डे, पो.म्हसा, ता.मुरबाड, जि.ठाणे याने आपले कब्जात बेकायदेशिररित्या १ किलो २३१ ग्रॅम वजनाचा मादक अंमली पदार्थ (गांजा) हा विक्री करण्याचे उददेशाने बाळगलेल्या स्थितीत मिळुन आला म्हणून त्यास अटक करून त्याच्यावर नेरळ पोलीस ठाणे गु.र.नं. ८९/२०२४ एन.डी.पी.एस. अधिनियम, १९८५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर लिंगप्पा सरगर हे करीत आहेत. पोलिसांच्या या धडकेबाज कारवाई मुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.