चंद्रपूर महानगरपालिकाची 9 प्रतिष्ठानांवर कारवाई; 68 हजारांचा दंड वसूल.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
चंद्रपूर, ता.21 :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिका हद्दीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु करून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गुरुवारी ता. 20 मनपाने चंद्रपूर शहरातील झोन क्रमांक 2 अंतर्गत येणाऱ्या 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 68 हजारांचा दंड वसूल केला.
मनपा आयुक्त राजेश मोहिते यांच्या निर्देशानुसार झोन क्र. 2 चे सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक भुपेश गोठे, विवेक पोतनुरवार आदी आपल्या 2 कर्मचा ऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. लक्ष्मी ऑटो 15 हजार, एसजी हार्डवेअर 15 हजार, राकेश गणवीर 15 हजार, हाजी दादा हासम चिनी 5 हजार, गुरुनानक एजन्सी 5 हजार, क्रिशन अग्रवाल 5 हजार, ब्रम्हानी ट्रेडस 3 हजार, संदीप वैरागडे 3 हजार, हरिक्रिशन फिंगर कारखाना 2 हजार, असा एकूण 68 हजारांचा दंड वसूल करण्यात आला. यापुढेही नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी प्रतिष्ठान सील करण्यात येईल, अशी ताकीद मनपाकडून देण्यात आली.