मुंबईत कोरोना महामारीत बाप लेकाने केला 418 कोटीचा भष्ट्राचार.

23

मुंबईत कोरोना महामारीत बाप लेकाने केला 418 कोटीचा भष्ट्राचार.

मुंबईत कोरोना महामारीत बाप लेकाने केला 418 कोटीचा भष्ट्राचार.
मुंबईत कोरोना महामारीत बाप लेकाने केला 418 कोटीचा भष्ट्राचार.

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोना वायरस महामारीचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव सुरु अनेक व्यवसाय उद्योग, व्यापार पूर्णत ठप्प झाले आहे. अशावेळी मुंबईतुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुंबईत तब्बल 418 कोटी रुपयांचा घोटाळा समोर आल्याने कंपनीतील सभासद आणि संचालकामध्ये एकच खळबळ उडाली आहे

मुंबईच्या घाटकोपरमधील व्यापारी असलेल्या बाप आणि मुलाने संगममत करुन आपल्या कंपनीतील पार्टनरचा विश्वासघात करुन कंपनीत मोठ्या प्रमाणात अफरातफर केल्याचं समोर आल आहे. कंपनी सदस्यांच्या परवानगी शिवाय आपल्या कंपनी पार्टनरला वगळून तब्बल 418 कोटीची फसवणूक केल्याप्रकरणी पंतनगर पोलिसांत या भष्ट्राचारी बाप आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल होण्याची बातमी कळताच आरोपी पिता पुत्र फरार होण्यास अशश्वी झाले. दरम्यान हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

63 वर्षीय फिर्यादी मुकेश मेहता आणि आरोपी कमलेश शहा हे दोघेही एका कंपनीत पार्टनर होते. पण 2013 साली आरोपी कमलेश शाह यांनी फिर्यादी मुकेश मेहता यांच्याशी फारकत घेतली. कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता, परवानगीशिवाय कंपनीचं कार्यालयही इतरत्र हलवलं. त्यानंतर आरोपी कमलेश शहा याने मग स्वतंत्र कंपनी स्थापन केली. साल 2018 मध्ये तक्रारदार मेहतांनी जेव्हा एका वेबसाईटवर कंपनीबाबत माहीती घेतली तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली. फिर्यादी मेहता हे सुद्धा या कंपनीत भागीदार होते. त्यांनी अधिक माहिती घेतल्यानंतर कमलेश आणि राज दोघे मेहता भागीदार असलेल्या कंपनीच्या नावे व्यापार करीत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. त्यातच हे ही लक्षात आले की, आरोपी कमलेश याने फिर्यादी मुकेश मेहता यांच्या मुलीची बनावट सही करून तब्बल 418 कोटी 50 लाखाचं कर्ज घेतलं. यापैकी 140 कोटींचं कर्ज आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड यांच्याकडून घेतल्याचा आरोप मुकेश मेहता यांनी दिली.

कमलेश आणि राज यांनी हवालामार्फतही 200 कोटीचं कर्ज घेतल्याचा आरोप करण्यात आलाय. बुकी आणि ज्वेलर्स यांच्याकडूनही पैसा उकळण्यात आले आहेत. त्यांनी केलेल्या फसवणुकीच्या शेअर सर्टिफिकेट, ऑथॉरिटी लेटर आणि भागीदार असलेल्या कंपनीची भागीदारीतील 300 कोटीची मालमत्ताही संगनमत करून विकल्याचा आरोप करण्यात आलाय. कमलेश आणि राज यांच्या संपर्क असलेल्या बँक, संस्था आणि मित्र परिवार यांचे लागेबांधे वरिष्ठ पातळीवर, तसेच मोठ्या लोकांशी असल्याचंही बोललं जात आहे. या घोटाळ्याबाबत पीडित कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं फिर्यादी मुकेश मेहता यांनी केलाय.