बुलडाण्यात पतीने उशीने तोड दाबून केली पत्नीची हत्या.

13

बुलडाण्यात पतीने उशीने तोड दाबून केली पत्नीची हत्या.

बुलडाण्यात पतीने उशीने तोड दाबून केली पत्नीची हत्या.

✒बुलडाणा, जिल्हा प्रतिनिधी✒
बुलडाणा :- बुलडाण्यात एक धक्कादायक आणि मनहेलावनारी बातमी समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीची हत्या केल्या नंतर आरोपी पती स्वतः पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पत्नीची हत्येची माहिती दिली. पोलिसांनी आरोपी पतीवर हत्येचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. शिवाजी कैलास आढाव रा. काकनवाडा, तालुका संग्रामपूर असे आरोपी पतीचे नाव आहे.

चार वर्षांपूर्वी अकोला जिल्ह्यातील कावसा येथील रहवासी असलेले संजीवनी आढाव हिच्यासोबत शिवाजीचा प्रेम विवाह झालेला होता. मात्र यांच्या जीवनात प्रेमाचे अंकुर फार दिवस टिकून राहिले नाही. काही दिवसातच या दोघां पती आणि पत्नी मध्ये मोठ्या प्रमाणात वाद – विवाद व्हायला सुरु झाले. वाद वाढत असल्याने हे प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचलं होतं. यांत पोलिसांनी मध्यस्थी करत दोघांमध्ये आपसात समझोता घडवून आणला होता.

पती-पत्नी त्यानंतर बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात भाड्याने राहायला आले. मात्र संजीवनी आढाव हिला पतीसह सासरकडील मंडळीही खूप त्रास देत होते. पती शिवाजी आढाव तिला मारहाण करत असल्याचा आरोप संजीवनीच्या नातेवाईकांनी केला आहे.
वादावादीनंतर पत्नीची उशीने तोंड दाबून हत्या

बुधवारी सायंकाळी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वादावादीतून पतीने उशीच्या सहाय्याने तोंड दाबून पत्नीला जीवे मारलं. यानंतर शिवाजी आढाव हा शेगाव शहर पोलिसात गेला. आपणच आपल्या पत्नीला ठार केल्याचे सांगत त्याने आत्मसमर्पण केलं. या प्रकरणी आरोपी पतीला ताब्यात घेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.