जैन धर्मगुरूंनी स्वप्नात येउन दिला उपदेश; घाटकोपरमधिल जैनमुनीची गळफास लावून आत्महत्या.

43

✒अभिजीत सकपाळ, मुंबई प्रतिनिधी✒
मुंबई,दि.21 मे:- मुंबईच्या घाटकोपर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्यामुळे या परीसरात जैन धर्माचा नागरीक हयगय व्यक्त करत आहे. घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर येथे असलेल्या लव गार्डन येथील जैन मंदिरात 71 वर्षीय जैन मुनीने रात्री सुमारास गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. धर्मगुरूंनी स्वप्नात येऊन दिलेल्या उपदेशानुसार आपण आत्महत्या करीत असल्याचे जैनमुनीने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येते.

लव गार्डन येथे असलेल्या जैन मंदिरात मुनी महेनद्र प्राणलाल देसाई मनोहरलाल महाराज ऊर्फ जैनमुनी वय 71 वर्ष हे गेल्या अनेक दिवसांपासून राहत होते. बुधवारी रात्री उशिरा जैनमुनीने मंदिरातील पंख्याला नायलॉन रस्सीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. या घटनेची माहिती मिळताच पंतनगर पोलिसांनी तेथे धाव घेऊन महाराजांना तत्काळ राजावाडी रुग्णालयामध्ये नेले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वी मृत घोषित केले. घटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोट मिळाली. त्या चिठ्ठीनुसार महाराजांच्या स्वप्नात काही दिवसांपूर्वी धर्मगुरू आले होते आणि त्यांनी उपदेश दिला होता की, पृथ्वीवरील तुमचे सर्व कार्य संपले आहे. तेव्हा तुम्ही माझ्याकडे या. आपण दोघे मिळून पूजा करू. धर्मगुरूंच्या उपदेशाला अनुसरून आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नसल्याचे जैनमुनीने त्या चिठ्ठीत म्हटल्याचे सांगण्यात येते. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.