कळमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदाराला निवेदन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍याचे मरण.

22

कळमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदाराला निवेदन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍याचे मरण.

कळमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदाराला निवेदन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍याचे मरण.
कळमेश्वर तालुका राष्ट्रवादीच्या वतीने तहसीलदाराला निवेदन खरिपाच्या तोंडावर शेतकर्‍याचे मरण.

युवराज मेश्राम नागपुर जिल्हा प्रतिनिधी

कळमेश्वर:- तालुक्यातील खरीप हंगामाच्या तोंडावर केंद्र सरकारने रासायनिक खताच्या किमती भरमसाठ वाढ केल्याने शेतकरी पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे असून आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे यामुळे देशात नागरी भाग सुद्धा केंद्र शासनाच्या विरोधी नाराजीचा सूर आहे. हा प्रकार म्हणजेच खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्याचे मरण आहे. केंद्र सरकारने खतांची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तहसिलदारामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

आधीच करून लाकडाऊन मुळे सर्वसामान्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहेत. त्यात वाढलेल्या खतांच्या किमतीने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. मागील वर्षी च्या दरात यावर्षी अचानकपणे दीडपटीने वाढ केल्याने शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलमडणार आहेत यात शंका नाही. रासायनिक खतांची दरवाढ करताना शेतकऱ्याची हलाखीची स्थिती करुणा संसर्गाचे सावट अवकाळी पाऊस चक्रीवादळ नैसर्गिक आपत्ती असल्यामुळे बाजारपेठेत आणलेला शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. करिता रासायनिक खताच्या किमती कमी कराव्यात अन्यथा शेकडो एकर शेती पडीत राहण्याची नाकारता येत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तहसिलदारामार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राहुल अंजनकर, शहराध्यक्ष बबन वानखेडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा महासचिव भुजंग भोजनकर, युवराज मेश्राम राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव, खुषाल मंडलिक राष्ट्रवादी युवा जिल्हा सचिव, जीवन बागडे नागपूर जिल्हा राष्ट्रवादी सहसचिव, श्रीराम भिवगडे, शुभम वानखेडे राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.