महामार्ग रुंदीकरणात अक्षय ऊर्जा योजनेला लागली नजर.

16

महामार्ग रुंदीकरणात अक्षय ऊर्जा योजनेला लागली नजर.

महामार्ग रुंदीकरणात अक्षय ऊर्जा योजनेला लागली नजर.
महामार्ग रुंदीकरणात अक्षय ऊर्जा योजनेला लागली नजर.

✒️मनोज खोब्रागडे✒️
पूर्व विदर्भ ब्युरो चीफ प्रतिनिधी
माहूर :- धनोडा ते कोठारी हा महामार्ग माहूर शहरातून जाणार असल्याचे निश्चित झाल्याने रोडचे रुंदीकरण झाल्यास अक्षय ऊर्जा योजने अंतर्गत उभारण्यात येणारे खांब राष्ट्रीय महामार्ग विशेष प्रकल्पाच्या अधिका-यांचा सल्ला घेवूनच उभारले जावेत अशा आशयाच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्रात त्याकाळी प्रकाशित करण्यात आल्या होत्या.मात्र तत्का.पदाधिकारी व सदस्यांचे हीत जोपासण्यासाठी नगर प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले.परिणामी महामार्गाचे काम सुरू झाल्या नंतर माहूर न्यायालया पासून शहरातील दत्त (टी पॉइंट) चौका पर्यंतचे खांब काढून टाकल्याने सदर योजनेसाठी खर्च करण्यात आलेला लाखो रुपयाचा निधी वाया गेला आहे.

सुमारे पाच वर्षापूर्वी माहूर शहरात अक्षय योजने अंतर्गत उभारण्यात आलेले खांब हवेची साधी झुळूक आली की, गोत्या खातात एवढे तकलादू आहेत. त्यावर लावलेल्या पथदिव्याचे बिल दप्तरी जरी दर्जेदार कंपनीचे जोडले असले तरी संपूर्ण शहरात खांब उभारे पर्यंत अर्धेअधिक पथदिवे बंद पडल्याने ते निश्चितच चीनी कंपनीचे होते,यावर शिक्कामोर्तब झाले आहे.तसेच विद्युत पुरवठ्यासाठी टाकलेले केबल सुध्दा केवळ एक फुट खोल नालीत टाकण्यात आल्याने व ,अधिकांश ठिकाणचे केबल आजही उघड्यावरच असल्याने कधी काय दुर्दैवी प्रकार घडेल याची शाश्वती देता येत नाही.सदरचे काम अतिशय थातूर-मातूर स्वरूपाचे झाल्यामुळे अधिकतर पथदिवे आजच्या घडीला बंदच आहेत.

नगर पंचायतीची निवडणुक अगदी तोंडावर असल्याने भविष्याचा विचार करण्यापेक्षा सदरचे काम उरकविण्यावरच तत्का.पदाधिकारी व सदस्यांनी अधिक जोर दिल्याने व तत्का.नगर प्रशासनाने त्याच तोडीची साथ दिल्याने अक्षय ऊर्जा योजना माहूर शहरासाठी कुचकामी ठरली आहे.