मजबुरीचा फायदा घेत लग्न लावून वरपक्षाला लुबाडण्याचा लागला छंद, मात्र पिंपळगाव हरेश्र्वर पोलीसांनी केले या चांडाळ चौकडीला जेरबंद.
ईसा तडवी
मिडिया वार्ता न्युज
पाचोरा तालुका प्रतिनिधी
मो. 9860884602
पाचोरा :- पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील चेतन विलास चौधरी वय 27 या तरुणाचे वय झाल्याने व समाजात मुली उपलब्ध नसल्याने या मुलाने मिळेल त्या समाजाची मुलगी करून घेण्याचा विचार केला होता म्हणून मुलगी शोधण्यासाठी त्याने त्याचे मेव्हणे चौधरी धुळे यांनी इतर समाजाच्या मुलीचे लग्न करण्यासाठी सुचवले होते या सूचनेनुसार चेतन ने आपल्या घरातील लोकांशी सल्लामसलत करून दुसऱ्या समाजाची मुलगी करण्यासाठी होकार मिळवल्यावर त्याने मेव्हण्याच्या मध्यस्थीने मेव्हण्याच्या परिचयातील राहणार पळसपुर तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांच्याशी संपर्क करून लग्नसंबंध जुळवण्यासाठी सुरेश शेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याच्याशी मेव्हण्याचे बोलणे करून दिले होते.व लग्न करायचे ठरवले. त्या नंतर ठरल्या प्रमाणे मुलीला व मध्यस्ती एजेंट ला व त्यांच्या साथीदारांना एक लाख साठ देऊन त्या मुलीच्या साथी दारांनी बनावट लग्न.करून व मुलीला डाग दागिने, लग्नाची साडी चोळी घेऊन चेतन या सोबत लग्न लावून आणले होते त्या नंतर दुसऱ्या दिवशी नवरी मुलगी घरातली कपाटातील पंचवीस हजार रोकड व डाग दागिने घेऊन रात्री दोन वाजेच्या सुमारास पसार झाली होती सकाळी चेतन याच्या लक्षात आले कि आपल्या सोबत धोका झालाय त्याने व त्याच्या मामाने लगेच पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन ला धाव घेऊन तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारी नुसार त्यांच्या वर्ती पिंपळगाव हरे पोलीस स्टेशन येथे भादंवि कलम 417/419/420/379/34 प्रमाणे दि. 06/05/2022 रोजी दाखल झालेला सदर गुन्हयाचा तपास स.पो.नि. महेंद्र वाघमारे यांच्या आदेशान्वये पोलीस नाईक 2572 रवींद्रसिंग पाटील हे तपास करीत होते. त्यांनंतर रवींद्रसिंग पाटील यांनी सापळा रचून एक पथक तयार करून. आरोपींना आठशे किलोमीटर जाऊन येऊन एकवीस तास प्रवास करून चार आरोपींना खेड्या पाड्यात शोध घेऊन अथक परिश्रम घेऊन अटक केली या कामगिरी निमित्त सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.त्या मध्ये त्यांनी चार आरोपी अटक केले ते पुढील प्रमाणे.
आरोपी- 1सुरेश उर्फ मिश्रीलाल सुलभा आर्य वय 38 रा. सोनवळ ता. सेंधवा जि. बडवानी मध्यप्रदेश
2)अनिल विश्राम धास्त वय 20रा. मोहमांडळी खरगोर. जि. खरगोन मध्यप्रदेश
3)हाकसिंग उर्फ आपसिंग शिकाया पावरा वय-38 रा. हेन्द्रया पाडा ता. शिरपूर जि. धुळे
4)कलिता उर्फ लक्स्मी किसन किराडा वय 19 रा माहे मांडली खरगोन जि. खरगोन मध्यप्रदेश येथून अटक केली
सदर गुन्ह्याचा मा.पोलीस अधिक्षक श्री प्रविण मुंडे , अप्पर पोलीस अधिक्षक श्री रमेश चोपडे, पोलीस उप अधिक्षक श्री. भरत काकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री महेंद्र वाघमारे
यांचे मार्गदर्शनाखाली या पथकाने कामगिरी केली
तपास पथक पो.ना. 2572 रवींद्रसिंग पाटील, पो.कॉ. पंकज देविदास सोनावणे, म.पो. कॉ.योगिता गोविंदा चौधरी यांनी केली