मोहल्ला इदगाह कब्रस्तानला जाणारा रस्ता सीमेंट कॉक्रीट करण्याची शिवसेनेची महानगरपालिकेकडे मागणी

मोहल्ला इदगाह कब्रस्तानला जाणारा रस्ता सीमेंट कॉक्रीट करण्याची शिवसेनेची महानगरपालिकेकडे मागणी

मोहल्ला इदगाह कब्रस्तानला जाणारा रस्ता सीमेंट कॉक्रीट करण्याची शिवसेनेची महानगरपालिकेकडे मागणी

संतोष आमले
पनवेल तालुका /प्रतिनिधी
9220403509

पनवेल : -पनवेल शहरातील मोहल्ला येथे इदगाह कब्रस्तानला जाणारा रस्ता सीमेंट कॉक्रीट करण्याची मागणी आज पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत इदगाह कब्रस्तानचे जावेद पटेल, जावेद कच्छी, उपशाहरप्रमुख अबरार मास्टर, सुजन मुसलोंडकर, शैलेश जगनाडे, जुनैद पवार, प्रशांत नरसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी सांगितले की, पनवेल मधील पटेल मोहल्ला येथे इदगाह कब्रस्तान आहे. सदर कब्रस्तान मध्ये शेवटपर्यंत जाण्यास मातीचा कच्चा रस्ता आहे. त्यामुळे पावसाळी सदर ठिकाणी चिखल जमा होतो. तसेच सदर कब्रस्तानचा वापर पनवेल शहरातील बहुतांश मुस्लीम करीत आहेत परंतू मातीचा रस्ता असल्यामुळे त्याचा त्रास दफन करताना होतो. सदर कब्रस्तानचा वापर कोविङच्या काळात बाहेरून आलेल्या मृतदेहांचे दफन करण्यात आले आहे. तरी अंतर्गत कॉक्रीट रस्ता तयार करून कब्रस्तानात रस्त्याची सुविधा उपलब्ध करून दयावी अशी मागणी करण्यात आली आहे.