नागभीड व्यापारी संघाच्या वतीने करिअर मार्गदर्शन
अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभीड –व्यापारी संघा च्या वतीने नववी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन आज 11 वाजता रुक्मिणी सभागृह नागभीड येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूरचे तज्ञ मार्गदर्शक मा श्री.मिलिंद आपटे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल कोरपेनवार सर,कर्मवीर विद्यालयाचे प्राचार्य देविदास चिलबुले सर,जनता कन्या विद्यालयाचे प्राचार्य मेहर सर,जनता विद्यालयाचे प्राचार्य राऊत सर,गोंडवाना विद्यापिठाचे सिनेट सदस्य अजयजी काबरा,नागभीड व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी यांची उपस्थिती होती
यावेळी प्राचार्य कोरपेनवार यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. मिलिंद आपटे सर यांचे परिचय करून दिला.
आपल्या मार्गदर्शनात मा. मिलिंद आपटे सर यांनी 10वी,12वी नंतर काय करता येईल याविषयी अनेक कोर्सेस ची विस्तृतपणे माहिती दिली. आपल्याला काय करायचे आहे न आपण कोणती फील्ड निवडू शकतो हे ध्येय ठेऊन ते पूर्ण करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थी,शिक्षक, पालक यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्मानी यांनी विद्यार्थ्यांसाठी यापुढेही व्यापारी संघाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याच्या मानस असल्याचे व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश ठाकरे यांनी केले तर आभार व्यापारी संघाचे सचिव विजय बंडावार यांनी मानले.. यावेळी पत्रकार ,बहुसंख्य विद्यार्थी,पालक,शिक्षक यांची उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी संघ कार्यकारणी सदस्य तसेच सल्लागार समिती सदस्य यांनी अथक परिश्रम केले.
======