सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेस याच्या संयुक्त विद्यमाने करिअर मार्गदर्शन शिबीर
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१
रायगड : – रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात इंग्लिश स्कूल जावळी येते इयत्ता १० वी व १२ वी शिकत असलेल्या विद्यार्थी करिता योग्यता चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना आदिती ताई तटकरे याच्या हस्ते सरस्वती मातेला दिप्पप्रर्ज्वलन करून झाले त्याचप्रमाणे इयत्ता १० वी व १२ वी शिकत असलेल्या विद्यार्थी ना पुढील मार्गदर्शन दिले त्यांच्यातील गुण आणि करिअर म्हणून एखादे क्षेत्र निवडण्यासाठी मदत करणारी ही योग्यता चाचणी आहे असे सांगितले स्वतः ला घडविण्यासाठी तसेच स्वतः ला सिद्ध करण्यासाठी ही एक सुवर्णंसंधी आहे आपल्या करिअर मध्ये तुम्हाला काय बनायचे आहे तुम्ही स्वतःला काय बनवू इच्छित आहात हे मार्गदर्शन देण्यात आले. या कार्यक्रम ला माणगांव तालुक्यातील सर्व शालेय व्यवस्थापन, गट शिक्षण अधिकारी,मुख्याध्यापक शिक्षक, पालक व विध्यार्थी आले होते. हा कार्यक्रम शनिवार दि २१ मे २०२२ ते सोमवार दि २३ मे २०२२ पर्यंत आयोजित केला आहे. या कार्यक्रम ला विशेष सहकार्य इंग्लिश स्कूल जावळी चे अध्यक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माणगांव तालुका अध्यक्ष सुभाष केकाने, रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग ( माध्यमिक ), प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई याच्या माध्यमातून होत आहे.