पनवेल जवळील एक्सप्रेस वेवर झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तिघे जण जखमी

पनवेल जवळील एक्सप्रेस वेवर झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तिघे जण जखमी

पनवेल जवळील एक्सप्रेस वेवर झालेल्या दोन वाहनांच्या अपघातात तिघे जण जखमी

संतोष शिवदास आमले
पनवेल तालुका प्रतिनिधी
9220402509

पनवेल जवळील मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई-पुणे हायवे लेन नं 01 वर 11 किमीच्या जवळ दोन वाहनात झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सचिन बिडवई (वय 47) हे त्यांच्या ताब्यातील रेनॉल्ड कायगर गाडी क्रमांक एमएच 12 टीएस 3087 ही खारघर येथून पुणे येथे घेऊन जात असताना मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवेवर मुंबई-पुणे हायवे लेन नं 01 वर 11 किमीच्या जवळ पाठीमागून येणारी हुंडयाई वेन्यू गाडी क्रमांक एम एच 05 ईजे 5565 वरील चालक धिरज छाब्रिया (वय 24) याने त्यांच्या गाडीला पाठीमागून ठोकर मारून अपघात करून अपघातामध्ये सचिन बिडवई यांची गाडी डिव्हायडरला घासली तसेच धिरज छाब्रिया याची गाडी दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये सचिन बिडवई, त्यांची पत्नी रूपाली बिवडई व दीक्षा छाब्रिया हे जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून याची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.