२० मे रोजी पोलीस मदत केंद्र मुरकुड्डोह येथे नवीन इमारतीचे लोकार्पण

54

२० मे रोजी पोलीस मदत केंद्र मुरकुड्डोह येथे नवीन इमारतीचे लोकार्पण

अमित सुरेश वैद्य

सालेकसा तालुका प्रतिनिधि

मो: 7499237296

सालेकसा तालुक्यातील अतिसंवेदनशील नक्शल क्षेत्र असलेला गांव मुरकुटडोहडंडारी येथे महाराष्ट्र राज्याचे वन सांकृतीक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री गोंदिया जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते पोलीस मदत केंद्र भव्य बिल्डिंग बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गडचिरोली-चिमुर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्री अशोक नेते साहेब प्रामुख्यानं उपस्थीत होते पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटिल जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल देवरी उप-विभाग अधिकारी अमोल सागर साहेब पिंगळे आदिवासी नेता शंकरजी मंडावी पंचायत समिति सदस्य अर्चना मडावी तहसीलदार कोंडागुला साहेब व गावकरी उपस्थित होते

 महाराष्ट्र,मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ तीन्ही राज्यातील पोलीस बल चे अधिकारी व मोठ्या संख्येने गावकरी तसेच सालेकसा तालुका सह जिल्ह्यातुन मोठ्या संख्येत मीडिया वाले बांधव हजर होते.आरोग्य विभागा कडुन आरोग्य तपासनी करून सहयोग करण्यात आले.

   विधान सभा आमगांव अंतर्गत मागील अनेक वर्षा पासुन रखडलेले सालेकसा आणि देवरी तालुका तील खालील अडचनी सोडविण्या करीता निधी उपलब्ध करून कामांना करवून देने बाबत मा. मंत्री महोदयांना खालील अर्ज सादर करण्यात आले. त्याच प्रमाने सरपंच व गावकर्यानी तसेच पं.स. सदस्यानी सुध्दा अर्ज सादर केले.