नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन वाघिणींना सोडण्यात आले.

धुर्व कुमार हुकरे 

जमाकुडो प्रतिनिधी 

मो:9404839323

नागझिरा- वन्यप्रेमींची मागणी आणि त्या अनुषंगाने खासदार सुनील मेंढे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या प्रयत्नातून आज नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात दोन नवीन वाघिणींना सोडण्यात आले. राज्याचे वनमंत्री सुधिर मुंगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी खासदार अशोक नेते, आमदार विजय राहांगडाले, आमदार मनोहरजी चंद्रीकापूरे व वनविभागाची इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

व्याघ्र संवर्धन आणि स्थानांतरण या उपक्रमांतर्गत या दोन वाघिणींचे चंद्रपूर जिल्ह्यातून स्थानांतरण करून त्यांना आज नागझिरा अभयारण्य सोडण्यात आले. पर्यटन आणि वन्यजीवाच्या संदर्भात खासदार यांची सकारात्मकता म्हणूनच आज हे शक्य झाल्याचे वनमंत्र्यांनी सांगून खासदारांच्या धडपडीचे कौतुक केले. भविष्यात आणखी तीन वाघ सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here