विज्ञान शाखेच्या 100 टक्के निकालासह जनता करिअर लॉन्चरची यशस्वी परंपरा कायम
मीडिया वार्ता वृत्तसेवा
मो: 8830857351
चंद्रपूर, 21 मे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीच्या सत्र 2023-24 चा निकाल मंगळवार, 21 मे रोजी जाहीर झाला. यानुसार याहीवर्षी जनता करिअर लॉन्चरने यशाचा इतिहास अबाधित ठेवला असून, जनता करिअर लॉन्चर विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.
जनता करिअर लॉन्चरमधून तन्वी चलाख, रोशन आवारी, तुषार महाकुलकर, अनुश्री घोडमारे, आशीयाणा खोकर, समेक भागवत, गणेश वासेकर, प्रणय दांडेकर, पलक आवळे, तीलक बुरे, श्रेया वाडस्कर, क्रिश गानफाडे, ऋतुजा बोबडे, भार्गव मेहता, हर्षल साळवे, तेजस ढेंगळे, सुशांत धोडरे, पारख सतीबावणे, धनश्री नागपुरे आदी विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत. यामध्ये 85 टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणारे 42 विद्यार्थी, 80 ते 85 टक्के दरम्यान गुण घेणारे 68 विद्यार्थी, तर 70 ते 80 टक्के दरम्यान 54 विद्यार्थी प्राविण्यप्राप्त झाले आहेत.
प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जिवतोडे, प्राचार्य डॉ. एम. सुभाष, उपप्राचार्य के. ए. रंगारी तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
• जनता महाविद्यालयाचा बारावीचा उत्कृष्ठ निकाल
• बारावीच्या निकालात जेसीएलचे विद्यार्थी चमकले
जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल 99.04 टक्के, कला शाखेचा निकाल 80, वाणिज्य शाखेचा निकाल 90.78, तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल 95.83 टक्के इतका लागला आहे. महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून झोया खान 93.33 टक्के, धनश्री शास्त्री 92, गुरनिश कौर जूनेजा 91.83, तन्वी चलाख 89.67, सृष्टी आडवे 88.33, स्नेहा गिरसावळे 88, खुशी अरवेलिवार 87.67, सृष्टी देवांगन 87.67, अहर्त निमगडे 87.50, अर्पित भाकरे 87.33, चिन्मय चाफले 87.33, रोशन आवारी 87.17, आर्यन गोमासे 87.17, स्नेहजित अंबागडे 86.83, तुषार चौधरी 86.83, पूर्वा पायपरे 86.67, अनुष्का मल्लेलवार 86.50, प्रांजली इटकलकर 86.33, माहिनुर माली 85.67, शबीना अब्दुल शफी 85.50 टक्के हे विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत. कला शाखेतून तन्वी भागेवाड 69.70 टक्के, वंश चौधरी 66.50, गणेश सोनुले, वाणिज्य शाखेतून प्रतीक सपरे 89.67, प्रज्ञा बोढे 88.67, धीरज राजूरकर 85.83, एम.सी.व्ही.सी. शाखेतून सुशील टिपले 63.50 टक्के हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झाले आहेत.