इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के
विरुर स्टेशन : प्रविण चिडे
वीरूर :- नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ विरुर स्टेशन द्वारा संचालित इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथील विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के तर कला शाखेचा सुद्धा १०० टक्के निकाल लागला. राजुरा तालुक्यातील आदिवासी अति-दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तेलंगाना महाराष्ट्र राज्य सीमेवर असलेल्या विरुर स्टेशन येथील इंदिरा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल १०० टक्के तर विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला आहे.
यात विज्ञान शाखेतून प्रथम श्रेणीत पियुष रवींद्र चौधरी ८४.५० टक्के,द्वितीय श्रेया सत्यपाल ताकसांडे ८३.८३ टक्के, तृतीय आचल सुधाकर बावणे ८२.८३ टक्के तर कला शाखेत प्रथम श्रेणीत सानिका संजय ढवस ७४ टक्के, द्वितीय साक्षी प्रभाकर ढवस ७३.३३ टक्के, तृतीय दीक्षा संतोष निकोडे ७० टक्के, यात कला व विज्ञान शाखेतील प्राविण्य श्रेणीत २० तर प्रथम श्रेणीत ७३ विद्यार्थी आले असून या यशाचे श्रेय नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर ढवस व संस्था सचिव रमेश पायपरे व इतर सदस्य यांच्या मार्गदर्शनातून प्राचार्य, प्राध्यापक,प्राध्यापिका,यांच्या अथक परिश्रमामुळे हे घवघवीत यश प्राप्त झाले आहे.