टिप्पर मालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज

टिप्पर मालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज

त्रिशा राऊत नागपूर क्राईम रिपोटर
मो 9096817953

भिवापूर :- .गोंडबोरी फाट्याजवळ २६ एप्रिल २०२५ ला झालेल्या भिषण अपघात प्रकरणातील आरोपी टिप्पर मालकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आता पोलिसांना आरोपींना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे उल्लेखनीय आहे की साठगाव जि. चंद्रपूर येथील तीन निरपराध व्यक्ती ज्यामध्ये एक पाच वर्षीय बालकही होता त्यांच्या दुचाकीला उमरेडच्या दिशेन भरधाव वेगात जाणाऱ्या रेतीच्या टिप्परने गोंडबोरी फाट्याजवळ जोरदार धडक दिली होती या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता अपघातानंतर टिप्पर चालक वाहनारूह घटनास्थळावरून पसार झाला होता भिवापूर पोलिसांनी या प्रकरणातटिप्पर चालक कुणाल अरुण लोखंडे याला अटक केली असून त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे याशिवाय टिप्परचे मालक गणेश जुनघरे आणि वृषभतरणकर यांच्याविरुध्दही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अपघाताच्या दिवसापासून दोघेही फरार आहेत. दरम्यान फरार असलेल्या मालकांनी अटकपूर्व जामीनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता परंतू न्यायालयाने आज हा अर्ज फेटाळून लावल्याने पोलिसांना त्यांच्या अटकेसाठी आता अधिकृत संधी प्राप्त झाली आहे. पोलीस दोनही फरार आरोपींचा कसून शोध घेत आहेत.